Sunetra Pawar Phone Call To Uddhav Thackeray | महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या बारामती (Baramati) आणि राहुरी (Rahuri) विधानसभेची पोटनिवडणूक आता जवळ आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी हालचाल करण्यास सुरूवात केली आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्याचे काँग्रेस (Congress) पक्षाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्हं दिसत आहेत.
हेही वाचा – होर्मुझजवळ तणाव शिगेला; इराणने अमेरिकेचे A-10 लढाऊ विमान पाडले, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन
एकिकडे काँग्रेसने बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकासाठी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काँग्रेसच्या पोटनिवडणुकासाठी आपले उमेदवार उभे करणाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. काँग्रेस हा महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडी काँग्रेससोबत असणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. अशातच सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरेंच्यात नेमकी काय झाली चर्चा?
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत विधानसभा पोटनिवडणूक पार पडणार आहे. तर सुनेत्रा पवारांनी खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच आता त्या आमदारकीसाठी बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहे. यादरम्यान आता सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आहे. बारामती पोटनिवडणूकीत शिवसेनेनं पाठिंबा देण्यासाठी सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी, सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर महाविकास आघाडी काय निर्णय घेणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, दिल्लीहून बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी हिरवा कंदिल मिळाला आहे. तर या निवडणुकांसाठी काँग्रेसकडून सहा उमेदवार इच्छुक असल्याची माहिती समोर आली. तर काँग्रेसकडे राहुरी मतदारसंघासाठी चार उमेदवारांनी तिकिट मागितले आहे.












