Mumbai News | नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजधानी दिल्लीला (Delhi) पुन्हा एकदा टार्गेट करण्यात येणार होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवण्याचा कट होता, तर हा कट स्पेशल सेलच्या कारवाईनं उधळून लावण्यात आला आहे. याप्रकरणी हमास सिद्दीकी या तरूणाला अटक करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – “हमरीतुमरीची गरज नाही…”, काँग्रेसच्या निर्णयानंतर छगन भुजबळ अॅक्शन मोडमध्ये, बारामतीत राजकीय हालचाली वेगात
दिल्लीला पुन्हा एकदा टार्गेट केलं जाणार होतं?
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ नोव्हेंबर महिन्यात कार स्फोट करण्यात आला होता. या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता. ही घटना अजूनही लोकांच्या मनात ताजी असतानाच आता दिल्लीला पुन्हा एकदा टार्गेट करण्यात येणार होतं. एका टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत स्फोट घडवला जाणार होता. मात्र स्पेशल सेलच्या कारवाईनं हा कट उधळून लावण्यात आला आहे. दिल्ली स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत मुंबईतील कुर्ला येथून 18 वर्षांच्या हमास सिद्दीकीला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी हमास सिद्दीकीच्या वडिलांसोबत प्रसार माध्यमांनी संवाद साधला. यावर हमास सिद्दीक्कीचे वडील जलालुद्दीन सिद्दीकी म्हणाले की, माझा मुलगा आत्ताच 18 वर्षांचा झाला आहे आणि तो एक विद्यार्थी आहे. तो चांगला अभ्यासू मुलगा आहे. तो गुन्हेगार नाहीये. मात्र, स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं की, हमास 2-3 महिन्यांपासून गेम खळत होता त्यावेळी त्याचे कोणाशी तरी कनेक्शन झालं. तो काही लोकांच्या संपर्कात होता आणि दिल्लीमध्ये काहीतरी करण्याचा कट त्यांचा होता. त्यामध्ये हमास देखील सहभागी होता, असं अधिकाऱ्यांच म्हणणं आहे.
माझा मुलगा या कटात सामील नाही. या सर्व अफवा आहेत आणि त्या एजन्सीकडून पसरवल्या जात आहेत. माझा मुलगा असा नाहीये, असंही जलालुद्दीन सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष पथकानं मोठी कारवाई केली होती. लष्कर-ए-तोयबाचा (Laskar-e-taiba) दहशतवादी शब्बीर अहमदला (Terrorist Shabbir Ahmed) दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. लष्कर-ए-तोयबा पुन्हा सक्रिय झाली आहे. 6 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील एका मशिदीत स्फोट झाला होता. याचाच बदला घेण्यासाठी लष्कर-ए-तोयबा भारतात दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत आहे. दहशतवादी दिल्लीतील लाल किल्ल्यावर हल्ला करू शकतात, अशी माहिती समोर आली होती. तर चांदनी चौकातील मंदिरालाही दहशतवाद्यांनी टार्गेट केल्याची माहिती समोर आली होती. लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याची दहशतवादी शब्बीर अहमदची योजना होती. त्यामुळे शब्बीर आएसआय आणि लष्कर-ए-तोयबाच्या मदतीने भारतात दहशतवादी नेटवर्क स्थापन करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि कारवाईमुळे या मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला होता.












