Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बारामतीचं ठरलं! सुनेत्रा पवार विरूद्ध आकाश मोरे हायव्होल्टेज सामना रंगणार
Top News

बारामतीचं ठरलं! सुनेत्रा पवार विरूद्ध आकाश मोरे हायव्होल्टेज सामना रंगणार

Sunetra Pawar vs Akash More

Baramati election Sunetra Pawar vs Akash More : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गैरहजेरीत पार पडलेल्या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Deputy CM Sunetra Pawa) यांनी आज बारामती पोटनिवडणुकीसाठी (Baramati By-election) महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्ज भरला. तर तिकडं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) यांच्या गैरहजेरीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून आकाश मोरे (Akash More) यांनी अर्ज भरला. महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेनेनं उमेदवार दिला नाही आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला नाही. त्यामुळे आता बारामती विधानसभा पोटनिवडणूकीचे चित्र स्पष्ट झालं आहे. सुनेत्रा पवार विरूद्ध काँग्रेसचे आकाश मोरे असा हायव्होल्टेज सामना रंगणार असल्याचे निश्चित झालं आहे.

बारामतीत धनगर समाजाचं प्राबल्य

बारामती विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळं काँग्रेसनं आकाश मोरे यांच्या रूपानं धनगर चेहरा मैदानात उतरवलाय. बारामतीमध्ये धनगर समाज मोठ्या संख्येनं असल्याने काँग्रेसनं जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केलाय. आकाश मोरे यांचे वडील विजयराव मोरे त्याकाळी बारामतीत शरद पवारांचे विरोधक म्हणून ओळखले जात.

बारामतीत काँग्रेस पक्ष टिकवून ठेवला

शरद पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर ते त्यांच्यासोबत गेले नाहीत. त्यांनी बारामतीत काँग्रेस पक्ष टिकवून ठेवला. आकाश मोरे देखील वडलांचा हाच वारसा पुढे नेत आहेत. हीच गोष्ट ओळखून सुनेत्रा पवार यांच्याशी निवडणुकीच्या रिंगणात दोन हात करण्यासाठी काँग्रेसनं आकाश मोरे यांची निवड केल्याचं सांगितलं जातं.

शरद पवारांविरूद्ध बारामतीची निवडणूक लढवली

आकाश मोरे यांचे वडील म्हणजे ज्या विजयराव मोरेंनी एकेकाळी शरद पवारांविरूद्ध समाजवादी पक्षातर्फे बारामती विधानसभेची निवडणूक लढवली होती, 1967 च्या विधानसभा निवडणुकीत एस. सी. नायडू या विडी कामगाराला शरद पवारांविरोधात रिंगणात उतरवलं होतं त्याच विजयराव मोरेंना 1990 साली शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घेऊन विधानपरिषदेचे आमदार केलं होतं.

शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढले

पुढं जाऊन हेच विजयराव मोरे सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांसाठी 2024 मध्ये झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढले. आणि आता.. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिला नसतानाही विजयरावांचे चिरंजीव आकाश मोरे सुनेत्रा पवारांविरोधात पोटनिवडणुकीला उभे राहिले आहेत.

अर्ज माघारी घेण्याची तारीख यायचीये

आज तर कुठं अर्ज भरले गेलेत पण अजून अर्ज माघारी घेण्याची तारीख यायचीये. अर्ज माघारी घ्यायच्या शेवटच्या दिवशी पवार साहेब काय खेळी खेळतील आणि मोरे पिता-पुत्रांचं मन वळवून निवडणुकीतून कशी माघार घ्यायला लावतील, हे पवार साहेबांनाच माहीत! ते म्हणतात ना, टायगर अभी जिंदा है…

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts