Smriti Mandhana-Palash Muchhal’s Patchup | सध्या भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल (Palash Muchhal) हे दोघं चांगलेच चर्चेत आले आहेत. स्मृती मंधाना आणि पलाश मु्च्छलचा पॅचअप झाला असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे स्मृती आणि पलाश एकत्र आल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा – सुनेत्रा पवारांच्या जीवाला मोठा धोका? निनावी पत्राने वाढला तणाव; पत्रात नेमकं काय लिहिलं?
स्मृती मानधना-पलाश मुच्छलचा पॅचअप?
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न होणार होतं. त्यावेळी लग्नाची सर्व तयारी झाली होती. प्री-वेडिंग फंक्शन पार पडले होते. तर सांगलीतील फार्महाऊसवर लग्नाची सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, लग्नाच्या काही तासांअगोदर स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्याचं लग्न मोडलं. तर नंतर खुलासा झाला की पलाशने स्मृतीला लग्नापूर्वी फसवलं होतं त्यामुळे हे लग्न मोडण्यात आलं होतं. अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे पलाश आणि स्मृतीचा पॅचअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, पलाछ मुच्छलची बहिण पलक मुच्छल, तिचा पती मिथुन आणि स्मृती मानधानाचे वडील एकत्र दिसत आहेत. मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर हे तिघे एकत्र दिसले. यावेळी पलक स्मृतीच्या वडिलांच्या पाया पडताना दिसली. तर स्मृतीचे वडिल पलकला आशीर्वाद देऊन निघून जातात, असं या व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये सर्व काही ठीक झाल्याचं चित्र दिसत आहेत. तर आता पलाश आणि स्मृती पुन्हा एकदा एकत्र येणार का? असा सवाल सध्या चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.
View this post on Instagram
व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी पलाश-स्मृतीचा पॅचअप झाल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा व्हिडीओ जुना असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या या व्हिडीओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, 25 नोव्हेंबर 2025 रोजी पलाश आणि स्मृती एकमेकांसोबत लग्नगाठ बांधणार होते. मात्र, लग्नाच्या एक दिवस आधी पलाश हा एक दुसऱ्या तरूणीसोबत होता. त्याचे काही फोटो आणि चॅट्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर स्मृतीने या लग्नास नकार देत हे लग्न मोडलं. तर पलाशने हे सर्व खोटं असल्याचं सांगत स्वत:वरील आरोप नाकारले होते. त्यानंतर पलाशला जोरदार ट्रोल करण्यात आलं होतं.












