KKR vs LSG Match Today : आयपीएलमध्ये केकेआर आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंतचा हंगाम दोन्ही संघांसाठी चांगला नसला तरी, दोन्ही संघांनी आपलं खातं उघडलं आहे. हा सामना आज संध्याकाळी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. त्याआधी, आजचा सामना कोणता संघ जिंकू शकतो हे समजून घेऊया. सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी, सामना होण्याची दाट शक्यता आहे.
मागील सामन्यात पंतची अर्धशतकी खेळी :
आजचा आयपीएल सामना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाईल. लखनऊ संघानं पहिला सामना गमावला असला तरी दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत करुन त्यांनी जोरदार पुनरागमन केलं. या विजयात कर्णधार ऋषभ पंतनं नाबाद 68 धावा करुन महत्त्वाची भूमिका बजावली. मोहम्मद शमीचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे, ज्यानं केवळ 9 धावांत दोन फलंदाजांना बाद केलं.
हेही वाचा : स्मृती मानधना-पलाश मुच्छलचा पॅचअप? ‘त्या’ व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ
केकेआर पहिल्या विजयाच्या शोधात :
दरम्यान केकेआर म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सबद्दल बोलायचं झाल्यास, हा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. आधी त्यांना मुंबई इंडियन्सकडून आणि नंतर सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्सविरुद्धचा शेवटचा सामना पावसामुळं रद्द झाला, त्यामुळं त्यांना एक गुण मिळाला आणि गुणतालिकेत त्यांचं खातं उघडलं.
आजच्या सामन्यात एलएसजीचं पारडं थोडं जड :
केकेआर आणि एलएसजी यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झाल्यास, या दोघांनी आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. केकेआरनं दोन आणि एलएसजीनं चार सामने जिंकले आहेत. इथंही एलएसजीचं पारडं जड आहे. त्यामुळं, आज एलएसजी जिंकू शकतो असं वाटतं.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
कोलकाता नाइट राइडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे, रोवमैन पॉवेल, सुनील नरेन, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोडा, उमरान मलिक, कॅमरुन ग्रीन, फिन एलन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सायफर्ट, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, ब्लेसिंग मुझारबानी, सौरभ दुबे, आणि नवदीप सैनी.
लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), मिशेल मार्श, एडेन मार्कराम, हिम्मत सिंह, मॅथ्यू ब्रीट्जके, मुकुल चौधरी, अक्षत रघुवंशी, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, अर्शिन कुलकर्णी, आयुष बडोनी, मोहम्मद शमी, अवेश खान, एम. सिद्धार्थ, दिग्वेश सिंह, आकाश सिंह, प्रिंस यादव, अर्जुन तेंदुलकर, एनरिक नॉर्टजे, नमन तिवारी, मयंक यादव आणि मोहसिन खान.








