Jalna Crime News: आईच्या निधनानंतर बापाने दुसर लग्न करायचे निर्णय घेता आणि लग्नाच्या दिवशीच मुलाने घेतला जीव.यामुळे जालना जिल्ह्या हादरला आहे.
अजय गाढे| प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे ,संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा: सामाजिक समता आणि स्वच्छतेचा संदेश : सोलापूर विद्यापीठात संत गाडगेबाबा जयंती आणि वृक्षारोपण समारोह
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील रुई गावात दिलीप राजगुरू (वय 45) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच तात्काळ तीर्थपुरी पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासात दिलीप राजगुरू यांच्या डोक्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीचे गंभीर घाव असल्याचे आढळून आले, त्यामुळे ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केल्यानंतर पोलीसांना धक्कादायक माहिती समोर आली. दिलीप राजगुरू यांचा स्वतःचा मुलगा विलास राजगुरू (वय 19) यानेच आपल्या एका साथीदाराच्या मदतीने ही हत्या केल्याचे उघड झाले. पोलीसांनी संशयाच्या आधारे विलासला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
या हत्येमागील कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ते एकटेच राहत होते. दरम्यान, त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि विशेष म्हणजे, त्यांच्या विवाहाचा दिवस हा घटनेच्याच दिवशी ठरलेला होता. मात्र, वडिलांच्या या निर्णयाबद्दल मुलगा विलास नाराज होता. वडील दुसरे लग्न करत असल्याचा राग त्याच्या मनात खोलवर घर करून बसला होता.
एका मित्राच्या मदतीने
याच रागातून त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने वडिलांच्या हत्येचा कट रचला. सकाळच्या सुमारास संधी साधून विलासने कुऱ्हाडीने वडिलांवर सपासप वार केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ज्या दिवशी दिलीप राजगुरू यांचा नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती, त्याच दिवशी त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
रुई गावासह जालना जिल्हा
या घटनेमुळे रुई गावासह जालना जिल्हा हादरला आहे. नात्यांमधील वाढती दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो, याचे हे भीषण उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, तीर्थपुरी पोलीस ठाण्यात आरोपी मुलगा विलास राजगुरू आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशावरून तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार या करीत आहे.












