• Home
  • महाराष्ट्र
  • लग्न ठरलेल्या तरूणीला ऑफिसमध्ये बोलावलं अन्…, अशोक खरातचं आणखी एक धक्कादायक कृत्य उघड
Top News

लग्न ठरलेल्या तरूणीला ऑफिसमध्ये बोलावलं अन्…, अशोक खरातचं आणखी एक धक्कादायक कृत्य उघड

kharat case

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) ढोंगी ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. कारण ढोंगी अशोक खरातने एवढे काळे कारनामे केले आहेत की दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. खरातने आत्तापर्यंत अनेक महिलांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. त्याने विवाहित महिला आणि तरूणींच्या विश्वासाचा फायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत अनेक पीडित महिलांनी, तरूणींनी धैर्याने पुढे येत पोलीस स्थानकात खरातविरोधात तक्रार दाखल केली आहे. आताही एका तरूणीने खरातविरोधात तक्रार दाखल केली असून खरातचे आणखी एक धक्कादायक कृत्य समोर आले आहे.

हेही वाचा – “गुप्त बैठक झालेली…”, ठाकरेंचे खासदार खरंच शिंदे गटात जाणार? श्रीकांत शिंदेंचं थेट उत्तर

अशोक खरातने लग्न ठरलेल्या तरूणीची फसवणूक करत तिच्यावर केला अत्याचार

पीडित तरूणीने दिलेल्या तक्रारीनुसार, 2019 मध्ये मी अशोक खरातला पहिल्यांदाच भेटली होती. त्यावेळी त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवत मला सांगितलं होतं की, तू माझी सर्वात आवडती मुलगी आहे. मी तुझं कन्यादान करेन. हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला होता. त्यानंतर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन खरातला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर माझं लग्न होणार होतं.

लग्न होण्याच्या आधी खरातने मला दर्शन घेण्यासाठी आश्रमामध्ये बोलावलं होतं. 2022 मध्ये माझं लग्न होणार होतं. त्यामुळे मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन खरातकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. तेव्हा खरातने मला सांगितलं की तुला लग्नाआधी ईशान्येश्वर महादेव मंदिरात सिद्धपूजा करावी लागेल. त्यासाठी तुला एकटीला एकदा यावं लागेल. ही सिद्धपूजा केली तर तुला भविष्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत. मग खरातने मला पूजेच्या विधींबाबत सांगण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. तेव्हा मी तिथे गेले, तिथे गेल्यानंतर खरातने ऑफिसचे दार बंद केले आणि मला म्हणाला की काळजी करू नको मी तुला पुष्कराज देत आहे, त्यामुळे तुझ्यासोबत सर्वकाही ठीक होईल. नंतर त्याने मला प्रसाद खायला दिला, जो मी खाल्ल्यानंतर बेशुद्ध झाले. त्यानंतर खरातने माझ्यावर बलात्कार केला, असा धक्कादायक खुलासा पीडितेने केला.

पुढे तिने सांगितलं की, खरातने सलग तीन वर्ष माझ्यावर बलात्कार केला. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 पर्यंत खरातने मला मादक पदार्थ देत माझ्यावर बलात्कार केला. यानंतर बदनामी होईल या भितीने मी आणि माझ्या कुटुंबाने याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली नाही, अशी माहितीही पीडित तरूणीने दिली. दरम्यान, पीडितेने दिलेल्या या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधम खरातवर आणखी एक गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts