• Home
  • राजकारण
  • रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा आज शिर्डी पोलिस ठाण्यात हजर, खरात प्रकरणात चौकशी सुरू
Top News

रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा आज शिर्डी पोलिस ठाण्यात हजर, खरात प्रकरणात चौकशी सुरू

Pratibha Chakankar Shirdi police inquiry

Pratibha Chakankar Shirdi police inquiry: रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची बहीण प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) आज शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदवला जात आहे.

शिर्डी पोलीस ठाण्यात आज महत्त्वाची कारवाई पाहायला मिळाली. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची बहीण प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) आज चौकशीसाठी हजर झाले असून, अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवला जात आहे. समता पतसंस्थेशी संबंधित 132 खात्यांच्या तपासात हे प्रकरण समोर आले असून, या खात्यांमधून मोठ्या आर्थिक व्यवहारांचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर सध्या पोलिस आणि तपास यंत्रणांचे बारकाईने लक्ष ठेवत आहेत.

हेही वाचा: अरे बापरे! सोनं-चांदीत पुन्हा मोठी घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरात आज किती दर

या खात्यांमधून सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हे व्यवहार नेमके कसे झाले, खात्यांची उघाडणी कोणत्या माहितीने झाली यावर पोलीस तपास करत आहेत.

काही प्रश्न उपस्थित होत आहेत की ही खाती प्रत्यक्ष चाकणकर यांनी उघडली की अशोक खरातने त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून ती सुरू केली. या दिशेनेही चौकशी केली जात आहे.

तसेच अशोक खरात भक्तांकडून आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या झेरॉक्स घेत असल्याची माहिती आहे. त्या कागदपत्रांचा वापर करून त्याने मोठ्या प्रमाणावर खाती उघडली का, याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणात इतर लोकांचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

दरम्यान, अशोक खरातची (Ashok Kharat) पोलिस कोठडी आज संपत असून एसआयटीकडून पुन्हा कोठडी वाढवण्याची मागणी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts