Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
क्रीडा

IPL मध्ये आज हैदराबाद-राजस्थान आमनेसामने; वैभव सूर्यवंशीवर असेल नजर

IPL मध्ये आज हैदराबाद-राजस्थान आमनेसामने; वैभव सूर्यवंशीवर असेल नजर

हैदराबाद SRH vs RR Match : सनरायझर्स हैदराबादसाठी (sunrisers hyderabad) आयपीएलचा हा हंगाम आतापर्यंत संमिश्र स्वरुपाचा राहिला आहे. संघानं काही सामने जिंकले आहेत, तर काही गमावले आहेत. सोमवार, 13 एप्रिल रोजी त्यांचा सामना राजस्थान रॉयल्सशी (rajasthan royals) होणार आहे, जो संघ सध्या विजयाच्या मालिकेत आहे. अद्याप कोणताही संघ त्यांना हरवू शकलेला नाही. राजस्थानची विजयाची मालिका खंडित होईल, की हैदराबाद विजय मिळवण्यात यशस्वी होईल?

हेही वाचा : फलंदाजांच्या वादळी खेळीच्या बळावर RCB चा विजय; मुंबईचा सलग तिसरा पराभव

कुठं होणार सामना :

आयपीएलचा (IPL 2026) 21वा सामना आज खेळला जाईल. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR Match) यांच्यात खेळला जाईल. सामन्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सामन्याच्या वेळेत कोणताही बदल नाही. नाणेफेक सायंकाळी ठीक 7:00 वाजता होईल त्यानंतर सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होऊन रात्री 11:00 च्या सुमारास संपेल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सामने अधिक वेळ चालत असल्यानं, या सामन्यालाही विलंब झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

राजस्थान रॉयल्सचं पारडं हैदराबादपेक्षा जड :

दरम्यान, या सामन्यातील विजयाच्या शक्यतांबद्दल बोलायचं झाल्यास, राजस्थान रॉयल्सनं या हंगामात आतापर्यंतचे सर्व चार सामने जिंकले आहेत. चार सामन्यांतून आठ गुणांसह ते सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहेत. सध्या तरी असं दिसतं की, राजस्थान रॉयल्सच्या विजयाची शक्यता 55 ते 60 टक्के आहे. याचें कारण म्हणजे हैदराबादसाठी आतापर्यंतचा हंगाम संमिश्र राहिला आहे. त्यांनी चारपैकी फक्त एकच सामना जिंकला असून त्यांचे केवळ दोन गुण आहेत. मात्र, घरच्या मैदानावर खेळणे त्यांच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं.

वैभव सूर्यवंशीवरल असेल नजर :

राजस्थान रॉयल्ससाठी चांगली बातमी ही आहे की, त्यांचा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. हंगामात आतापर्यंत 200 धावांचा टप्पा गाठणारा तो एकमेव फलंदाज आहे. फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईनंही चार सामन्यांत नऊ बळी घेतले आहेत. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीनं मोठी आणि स्फोटक खेळी केली तरच हैदराबाद सामन्यात पुनरागमन करु शकतो. मात्र, संघाला त्यांचा कर्णधार पॅट कमिन्सची उणीव सतत जाणवत आहे.

दुसऱ्या डावात फलंदाजी करणं सोपं :

हैदराबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली मानली जाते. इथं जो कोणी कर्णधार नाणेफेक जिंकेल, तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे, कारण नंतर फलंदाजी करणं खूप सोपं होतं. शिवाय रात्री दव पडल्यास गोलंदाजांसाठी परिस्थिती आणखी कठीण होईल. कोणता संघ जिंकतो हे पाहणं बाकी आहे, पण आजचा सामना रोमांचक होईल हे निश्चित दिसते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts