Breaking News :
Pune

पुण्यात भेसळयुक्त मँगो पल्पचा मोठा भांडाफोड, 32 हजार किलो साठा जप्त

Pune mango pulp scam
67

Pune Mango Pulp Scam: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे आणि मावळ तालुक्यातील उरसे येथे 32 हजार किलो भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे आणि मावळ तालुक्यातील उरसे येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 32 हजार किलोचा मँगो पल्प चा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा आज शिर्डी पोलिस ठाण्यात हजर, खरात प्रकरणात चौकशी सुरू

या ठिकाणी मँगो पल्प तयार करताना साखरेऐवजी भेसळयुक्त पदार्थ, गाईचे दूध आणि केमिकलयुक्त केशरी रंगाचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या या मँगो पल्पमुळे ग्रामीण भागात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता.

मात्र, या भेसळयुक्त पल्पमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका तर आहेच, पण दीर्घकाळात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा देखील धोका व्यक्त केला जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी स्वस्त आणि अनोळखी ठिकाणांहून मिळणारा मँगो पल्प खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts