Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • पंजाबमध्ये भीषण अपघात! बस थेट दरीत कोसळली, 5 जणांचा जागीच मृत्यू
Top News

पंजाबमध्ये भीषण अपघात! बस थेट दरीत कोसळली, 5 जणांचा जागीच मृत्यू

Punjab Bus Accident | मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात अपघातांचे सत्र सुरूच आहे. आताही पंजाबमध्ये (Punjab) भीषण अपघात (Accident) घडला आहे. पंजाबच्या फतेहगड साहिब जिल्ह्यात एका बसचा मोठा अपघात (Bus Accident) घडला आहे. प्रवाशांनी भरलेली एक बस थेट दरीत कोसळून मोठा अपघात घडला आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा – भाजप आमदाराच्या मुलीची भररस्त्यात दादागिरी; तरुणाला बुटाने मारत केला तमाशा, व्हिडीओ होतोय व्हायरल

अपघात नेमका कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, फतेहगड साहिब जिल्ह्यात बस्सी पठाणाजवळ प्रवाशांनी भरलेल्या बसचा मोठा अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी ही बस आधी विजेच्या खांबाला धडकली आणि नंतर ती उलटली अन् थेट दरीत कोसळली. या अपघातादरम्यान बसमध्ये 35 ते 40 लोक प्रवास करत होते. तर या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनं पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना फतेहगड साहिब आणि बस्सी पठाणा येथील रुग्णालयांमध्ये दाखल केले. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात भीषण होता त्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली. तसेच या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सध्या बचावकार्य सुरू झाले. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की इतर कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts