Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • भाजप आमदाराच्या मुलीची भररस्त्यात दादागिरी; तरुणाला बुटाने मारत केला तमाशा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Top News

भाजप आमदाराच्या मुलीची भररस्त्यात दादागिरी; तरुणाला बुटाने मारत केला तमाशा, व्हिडीओ होतोय व्हायरल

BJP MLA Daughter Viral Video | सध्या भाजप (BJP) आमदाराच्या मुलीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजप आमदाराची मुलगी एक तरूणाला भररस्त्यात बुटाने मारहाण करताना दिसत आहे. तर ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ‘धुरंधर’ची दमदार कामगिरी; ‘बाहुबली’ अन् ‘पुष्पा’ला मागे टाकत रचला इतिहास

भाजप आमदाराच्या मुलीचं नाव प्रियंका पटेरिया असं आहे. तर प्रियंकाने संबंधित तरूण माझा पाठलाग करत होता म्हणून मी त्याला मारहाण केली असल्याचा, दावा केला आहे. तर दुसरीकडे पीडित तरूणाने हा दावा फेटाळत पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.

भाजप आमदाराच्या मुलीने का केली मारहाण? नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सागर जिल्ह्यातील देवरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार ब्रिजबिहारी पटेरिया यांच्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रियंका पटेरियाने राजेश शर्मा नावाच्या एका तरूणाला बुटाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. राजेश शर्मा हा सागर जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष विनीत पटेरिया यांच्या जवळचे आहेत. तर सोमवारी प्रियंकाने गौरझामर भागात एक बँक आहे, त्या बँकेच्या आवारात राजेश शर्माला बोलावलं. त्यानंतर प्रियंका आणि राजेश शर्मा यांच्यात मोठा वाद झाला. मग संतापलेल्या प्रियंकाने कारमधून उतरून पायातील बुटाने राजेशला मारहाण केली. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजेश शर्मा माझ्या गाडीचा पाठलाग करत होता. त्याच्यापासून मला धोका आहे, असं मला वाटलं. त्यामुळे मी रागाच्या भरात त्याला मारहाण केली, असा दावा प्रियंकाने केला आहे. मात्र, दुसरीकडे राजेश माझ्या वडिलांच्या विरोधात काम करत आहे, असं म्हणत प्रियंकाने त्याला मारहाण केला असल्याचा दावा राजेशने केला आहे. याबाबत त्याने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts