CM Samrat Chaudhary Oath Ceremony | आज भाजपच्या (BJP) राजकीय प्रवासात एक मोठा अध्याय सुरू झाला आहे. बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी (Bihar New CM) शपथ घेतली आहे. भाजप नेते सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) यांनी आज सकाळी 11 वाजता पटणा येथील लोक भवनात बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत जेडीयूचे आमदार विजय चौधरी (Vijay Chaudhary) आणि बिजेंद्र यादव (Bijendra Yadav) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर, सम्राट चौधरी यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा आपला दावा सादर केला होता.
हेही वाचा – अमरावतीत प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोजरची टांगती तलवार
सम्राट चौधरी यांनी बिहारचे 24 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
सम्राट चौधरी यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आणि ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन त्यांनी इतिहास रचला. सम्राट चौधरी यांनी बिहारचे 24 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याचे विद्यमान राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी सम्राट चौधरी यांना नव्या मुख्यमंत्रीपदाची अधिकृत शपथ दिली. तर आघाडीचा समतोल राखण्यासाठी जेडीयूच्या कोट्यातून दोन उपमुख्यमंत्र्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
जेडीयू आरक्षणातील विजय चौधरी आणि बिजेंद्र यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे कुशवाहा समाजाचे आहेत, तर उपमुख्यमंत्री विजय चौधरी भूमीहार समाजाचे आणि बिजेंद्र यादव ओबीसी समाजाचे आहेत. नवीन सरकारने जातीय समीकरणाकडेही बारकाईने लक्ष दिले आहे.
#WATCH पटना, बिहार: सम्राट चौधरी ने बिहार के मुख्यमंत्री पद की शपथ ली।
नीतीश कुमार के इस्तीफे के बाद वे बिहार के पहले भारतीय जनता पार्टी (BJP) के मुख्यमंत्री बन गए हैं। pic.twitter.com/HvYvwqZbXQ
— ANI_HindiNews (@AHindinews) April 15, 2026
मुख्यंमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर जेडीयूचे ज्येष्ठ नेते विजय कुमार चौधरी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगचेच दुसऱ्या मंत्रिपदासाठी बिजेंद्र प्रसाद यादव यांनी देखील राज्यपालांकडून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती. तर बिहारच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भाजप नेत्याने मुख्यमंत्रिपदाची खुर्ची भूषवल्याने या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.










