Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद; सेन्सेक्स 123 अंकांनी घसरला तर निफ्टी 24,200 च्या खाली
ताज्या बातम्या

देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद; सेन्सेक्स 123 अंकांनी घसरला तर निफ्टी 24,200 च्या खाली

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 639 तर निफ्टी 195 अंकांनी वधारला

Share Market Closing Bell : मागील सत्रातील तेजीनंतर, देशांतर्गत शेअर बाजार गुरुवारी घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स (sensex closes ) 122.56 अंकांनी घसरुन 77,988.68 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 34.55 अंकांनी घसरून 24,196.75 अंकांवर आला. निफ्टीमधील सर्वाधिक घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, ओएनजीसी, एचडीएफसी लाईफ, टायटन कंपनी आणि अपोलो हॉस्पिटल्स यांचा समावेश होता. वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये हिंडाल्को इंडस्ट्रीज, ट्रेंट, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि इटरनल यांचा समावेश होता.

हेही वाचा : विधान परिषद निवडणूक जाहीर; उद्धव ठाकरे पुन्हा सदस्य होणार? राजकीय

भविष्यात निफ्टीची वाटचाल कशी असू शकते :

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार नजीकच्या भविष्यात 24,320-24,350 ही पातळी निर्देशांकासाठी एक प्रमुख प्रतिकार क्षेत्र (रेझिस्टन्स एरिया) म्हणून काम करु शकते. जर निर्देशांक 24,350 च्या वर स्थिर राहिला, तर अल्पकालीन तेजी 24,500 पर्यंत वाढू शकते, त्यानंतर 24,650 च्या दिशेनं वाटचाल होऊ शकते. दुसरीकडे, 24,080–24,050 ही पातळी निर्देशांकासाठी तात्काळ आधार क्षेत्र म्हणून काम करेल.

रुपया 10 पैशांनी मजबूत बंद :

भारतीय रुपया गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 10 पैशांनी मजबूत होऊन 93.23 (तात्पुरता) वर बंद झाला. पश्चिम आशियामध्ये संभाव्य युद्धविरामाच्या अपेक्षेमुळं जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळं रुपयाला आधार मिळाला. मात्र, परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितलं की आयातदारांकडून डॉलरची वाढती मागणी आणि परकीय भांडवलाचा सततचा बहिर्वाह यामुळं रुपयाची वाढ मर्यादित राहिली. त्यांनी असंही नमूद केलं की जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे 95 डॉलर होत्या, तेव्हा देशांतर्गत चलन मजबूत झालं.

आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया 93.29 वर उघडला. दिवसभरात त्यानं 93.16 चा उच्चांक गाठला आणि 93.35 च्या नीचांकी पातळीवर घसरला. अखेरीस रुपया मागील बंद भावापेक्षा 10 पैशांनी वाढून 93.23 (तात्पुरता) वर बंद झाला. बुधवारी सकाळी रुपया प्रति डॉलर 93.33 वर बंद झाला होता, ज्यात 2 पैशांची वाढ झाली होती.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts