Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • फरार निदा खानचा ठावठिकाणा लागला? अटकेपासून वाचण्यासाठी आखला नवा प्लॅन
Top News

फरार निदा खानचा ठावठिकाणा लागला? अटकेपासून वाचण्यासाठी आखला नवा प्लॅन

Nashik IT Company HR Nida Khan | नाशिकमधील टीसीएस कंपनीत (Nashik TCS Company) कर्मचाऱ्यांचे धर्मांतर आणि लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून आरोपींना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी एचआर निदा खान (HR Nida Khan) ही अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली पथके रवाना केली आहेत. अशातच आता निदा खानबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

हेही वाचा – नाशिक प्रकरणात नवा ट्विस्ट; TCS कंपनीची फरार HR निदा खान प्रेग्नेंट, झाला धक्कादायक खुलासा

निदा खानचा नवीन प्लॅन काय?

निदा खानचा ठावठिकाणा लागल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, निदा खान ही सध्या भिवंडीत लपलेली आहे. तर तिने अटकेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी गरोदरपणाचा आव आणला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आरोपी निदा खान ही गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ती मुंबईत राहत असून लवकरच ती बाळाला जन्म देणार असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. तसेच निदा खानने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र, आरोपी निदा खान ही खरंच गरोदर आहे की नाही? याबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. तर जोपर्यंत तिची वैद्यकीय चौकशी होत नाही तोपर्यंत ती गरोदर आहे की नाही याबाबत ठामपणे सांगता येणार नाही. तसेच निदाने अटकेपासून वाचण्यासाठी गरोदरपणाचा आव आणल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, निदा खान ही महिला कर्मचाऱ्यांचा मोठा छळ करत होती. ती कंपनीच्या टीम लीडर्ससोबत मिळून महिला कर्मचाऱ्यांचा छळ करायची आणि त्यांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडत होती. ती महिला कर्मचाऱ्यांना इस्लामी धर्माचं पालन कसं करायचं, कपडे कसे घालायचे, बुरखा कसा घालायचा या गोष्टी शिकवत होती आणि त्यांना ते जबरदस्तीने करायला भाग पाडत होती, असा दावा पीडित महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच आरोपी निदा खान ही मागील काही दिवसांपासून फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts