Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • ग्लोइंग स्किन हवीये? चंदन आणि गुलाबजल ठरेल बेस्ट उपाय, जाणून घ्या जबरदस्त फायदे
ताज्या बातम्या

ग्लोइंग स्किन हवीये? चंदन आणि गुलाबजल ठरेल बेस्ट उपाय, जाणून घ्या जबरदस्त फायदे

Skin Care Tips | उन्हाळ्यात (Summer) बऱ्याच स्त्रिया ग्लोइंग स्किनसाठी (Glowing Skin) अनेक उपाय करताना दिसतात. मग पार्लरमध्ये जाऊन फेशियल, ब्लीच असो किंवा स्किन ग्लोइंगसाठी काही सौंदर्य उत्पादने वापरताना दिसतात. पण काही स्त्रियांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर तुम्हालाही तुमची स्कीन ग्लोइंग आणि मुलायम करायची असेल तर काही घरगुती उपायांनी तुम्हाला मोठे फायदे मिळू शकतात. यामध्येत आता उन्हाळ्यात त्वचेला थंडावा, ताजेपणा देण्यासाठी आणि त्वचा ग्लोइंज बनवण्यासाठी गुलाबजल आणि चंदनाचा वापर अत्यंत फायदेशीर मानला जातो. हे दोन्ही नैसर्गिक घटक त्वचेला केवळ आरामच देत नाहीत, तर ती स्वच्छ, मऊ आणि चमकदार ठेवण्यासही मदत करतात. चला तर मग आपण आता चंदन आणि गुलाबजलचे स्किनसाठी असलेले प्रभावी फायदे जाणून घेऊया.

हेही वाचा – लिंबू, कॉफीसारख्या गोष्टी त्वचेवर लावताय? ठरू शकतं घातक, जाणून घ्या साइड इफेक्ट्स

चंदन आणि गुलाबजलचे स्किनसाठी असलेले प्रभावी फायदे कोणते?

डाग आणि मुरुमे कमी करते – चंदन आणि गुलाबजल यांचे मिश्रण त्वचेसाठी एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. हे विशेषतः डाग आणि मुरुमांवर खूप चांगले काम करते. जर तुमच्या स्कीनवर काळे डाग, पिंपल्स असतील तर त्यावर तुम्ही चंदन पावडर आणि गुलाबजलचा फेस पॅक लावू शकता. यामुळे तुमच्या स्कीनवरील डाग, पिंपल्स जाण्यास मदत होते आणि तुमची स्कीन ग्लोइंग होते.

त्वचा उजळवणे – चंदन आणि गुलाबजल यांचे मिश्रण त्वचा उजळ करण्यासाठी आणि त्वचेवरील काळवंडपणा कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. गुलाबजल त्वचेची खोलवर स्वच्छता करते तर चंदन पावडर त्वचेतील मेलॅनिन कमी करते आणि रंग सुधारते. त्यामुळे गुलाबजल आणि चंदनाच्या नियमित वापरामुळे त्वचा ताजीतवानी आणि तेजस्वी होते.

त्वचेवरील टॅनिंग, लालसरपणा कमी होतो – चंदनाच्या पावडरमध्ये गुलाबजल मिसळून बनवलेली पेस्ट उन्हामुळे टॅन झालेली त्वचा, त्वचेवरील लालसरपणा घालवण्यासाठी एक प्रभावी आणि त्वरित नैसर्गिक उपाय आहे. हे मिश्रण त्वचेला आराम देते, दाह कमी करते आणि त्वचा उजळवण्यास मदत करते. तसेच चंदनाची पावडर गुलाब पाण्यात मिसळून ती त्वचेवर लावल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. तसेच, त्वचा मऊ झाल्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यासही मदत होते.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts