Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • उत्तर जपान शक्तिशाली भूकंपानं हादरलं; त्सुनामीचाही इशारा जारी
ताज्या बातम्या

उत्तर जपान शक्तिशाली भूकंपानं हादरलं; त्सुनामीचाही इशारा जारी

7 magnitude earthquake tremors felt in America’s neighbouring country; no damage reported

टोकियो Earthquake Struck Japan : भूकंपांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानमध्ये आणखी एका मोठ्या भूकंपाचा धक्का बसला आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.4 मोजली गेली. एपीच्या वृत्तानुसार, हा भूकंप उत्तर जपानच्या किनाऱ्याजवळ झाला. आतापर्यंत झालेल्या सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी हा एक असल्याचं मानलं जात आहे. भूकंपानंतर त्सुनामीचाही इशारा जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा : सूरतच्या उधना स्टेशनवरील गर्दी आटोक्यात; रेल्वेकडून आज स्पेशल गाड्यांची सोय

भूकंपाचं केंद्र 10 किलोमीटर खोलीवर :

वृत्तानुसार, उत्तर जपानमधील सान्रिकू किनाऱ्याजवळ एक शक्तिशाली भूकंप झाला. हा भूकंप समुद्रात झाला. स्थानिक वेळेनुसार दुपारी 4:53 च्या सुमारास (जीएमटीनुसार सकाळी 07:53 वाजता) भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचं केंद्र समुद्रसपाटीपासून सुमारे 10 किलोमीटर (6 मैल) खाली होतं. जपानच्या सरकारी वृत्तवाहिनी एनएचकेनं (NHK) दिलेल्या वृत्तानुसार, या भागात 3 मीटर (10 फूट) उंचीची त्सुनामी (समुद्राची लाट) येण्याची शक्यता आहे, ज्यामुळं या भागावर खूप लवकर परिणाम होऊ शकतो. आतापर्यंत त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून, स्थानिक प्रशासनाने लोकांना सतर्क राहून उंच ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे.

भूकंपाच्या तीव्रतेनुसार काय परिणाम होऊ शकतो :

0 ते 1.9 रिश्टर स्केलचा भूकंप केवळ सिस्मोग्राफद्वारे ओळखला जाऊ शकतो. 2 ते 2.9 तीव्रतेचा भूकंप आल्यास सौम्य धक्के बसतात. जेव्हा 3 ते 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप होतो तेव्हा त्याचा परिणाम जवळून जाणाऱ्या ट्रकसारखा होतो. 4 ते 4.9 तीव्रतेचा भूकंप आल्यास खिडक्या फुटू शकतात. तसंच भिंतींवर टांगलेल्या फ्रेम्स पडू शकतात. 5 ते 5.9 रिश्टर स्केलचा भूकंप आल्यास फर्निचर हलू शकते. 6 ते 6.9 तीव्रतेचा भूकंप आल्यास इमारतींना तडे जाऊ शकतात. तसंच वरच्या मजल्यांचं नुकसान होऊ शकते.

भूकंप का होतात? :

पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स जिथं जिथं एकमेकांवर आदळतात तिथं भूकंपाचा धोका असतो. जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा भूकंप होतो. प्लेट्स एकमेकांवर घासतात आणि त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. त्या घर्षणामुळं जमीन थरथरायला लागते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts