NEET Admit Card 2026: NEET 2026 परीक्षा 3 मे रोजी होणार असून 26 एप्रिलला अॅडमिट कार्ड जाहीर होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात याबाबत थोडक्यात माहिती
नीट (NEET) २०२६ परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) ३ मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी महत्वपूर्ण अपडेट्स जारी केले आहेत. प्रवेशपत्र २०२६ एप्रिल रोजी प्रसिद्ध केले जाईल आणि त्यात परीक्षा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.
९९ % विद्यार्थ्यांनात्यांचे आवडते शहर मिळाले
एनटीएने (NTA) प्रसिद्ध केलेल्या शहर सूचनेनुसार, जवळपास ९९% विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे परीक्षा शहर मिळाले आहे. यामुळे स्थलांतर आणि निवासाच्या समस्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शहरात परीक्षा देण्याची संधी मिळेल.
प्रवेशपत्र २६ एप्रिल
नीट २०२६ चे प्रवेशपत्र २६ एप्रिल रोजी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी ते वेळेत डाउनलोड करून त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रात परीक्षा केंद्राचा पत्ता, वेळ आणि महत्त्वाची माहिती दिलेली असेल.
एनटीए कडून मार्गदर्शन
एनटीएने विद्यार्थ्यांना शांत राहून आत्मविश्वासाने तयारी करण्याचे आवाहन केले आहे. परीक्षा पारदर्शक आणि पद्धतशीरपणे घेण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि सकारात्मक विचारांनी परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला देण्यात येत आहे.









