• Home
  • ताज्या बातम्या
  • मिडल ईस्टमध्ये भारत बजावू शकतो महत्त्वाची भूमिका; राजनाथ सिंह यांनी सांगितला “प्लॅन”, पंतप्रधान मोदी सूत्रे हाती घेणार का?
ताज्या बातम्या

मिडल ईस्टमध्ये भारत बजावू शकतो महत्त्वाची भूमिका; राजनाथ सिंह यांनी सांगितला “प्लॅन”, पंतप्रधान मोदी सूत्रे हाती घेणार का?

India Middle East Role

India Middle East Role: मिडल ईस्टमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो, असे संकेत राजनाथ सिंह यांनी दिलेया आहेत. आता पंतप्रधान मोदी पुढाकार घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संकेत दिले आहेत की, पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत भविष्यात मध्यस्थीची भूमिका बजावू शकतो. त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, योग्य वेळी आलियावर भारताच्या दिशेने प्रयत्न करेल आणि त्यात यशस्वी होईल.

हेही वाचा: उन्हाळ्यात रिकाम्या पोटी बाहेर जाणं टाळा; नाहीतर ‘या’ समस्या उद्भवू शकतात

राजनाथ सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नमूद केले की, आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंधांमध्ये पंतप्रधानांचा दृष्टिकोन संतुलित आहे.

हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अणुकार्यक्रमावरील मतभेदांमुळे पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चेचा दुसरा टप्पा थांबला आहे.

तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू

दरम्यान, संबंधित देशांमध्ये सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. काही काळासाठी संघर्ष टाळण्याचा निर्णय घेतला गेला असला, तरी मतभेद अद्याप कायम आहेत.

चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता

दोन्ही बाजूंनी संवादासाठी पुन्हा प्रयत्न सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत न झाल्यामुळे चर्चेत अडथळे येत आहेत.

पुढील घडामोडींवर लक्ष

या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भारताची संभाव्य मध्यस्थी भूमिका आगामी काळात महत्त्वाची ठरू शकते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts