Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • लग्न ठरलं, प्रेयसीला फ्लॅटवर बोलावलं, शक्तीवर्धक गोळ्याने जीव गेला
Top News

लग्न ठरलं, प्रेयसीला फ्लॅटवर बोलावलं, शक्तीवर्धक गोळ्याने जीव गेला

performance enhancing pill death

performance enhancing pill death : नुकतंच त्याचं लग्न ठरलं होतं, दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते, पण अचानक त्याच्या रूममध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचा ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. मयत तरुण हा नागपूर इथं राहणारा होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर इथं राहणारा रोहित लाला (वय २९) असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण हरियाणाच्या गुरुग्राम इथं एका मोठ्या कंपनीत कामाला होता. गुरुग्राम सेक्टर -53 इथं रोहित हा एका फ्लॅटमध्ये रेंटने राहत होता. फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. जेव्हा रिपोर्ट समोर आला तेव्हा धक्कादायक कारणं समोर आली.

हेही वाचा – मोठी बातमी! नागपुरात हिट अँड रनमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या 70 वर्षीय महिलेचा मृत्यू; चालक फरार

रूममध्ये आढळल्या लैंगिक शक्तीवर्धक गोळ्या

रोहित हा फ्लॅटवर एकटाच राहत होता. त्याच्यासोबत दररोज जाणाऱ्या सहकाऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली होती. रोहित बराच वेळ झाला फोन उचलत नव्हता, त्यामुळे पोलिसांना याची माहिती दिली. गुरुवारी सकाळी पोलीस जेव्हाा फ्लॅटचा दरवाजा तोडून आतमध्ये गेले तेव्हा रोहितचा मृतदेह आढळला. त्यावेळी पोलिसांनी रुमची तपासणी केली तेव्हा रूममध्ये लैंगिक शक्ती वर्धक गोळ्या सापडल्या.

प्रेयसीला भेटायला फ्लॅटवर बोलावलं होतं

पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा रोहित लाल हा नागपूर इथं राहणार होता. तो नवी दिल्लीतील क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया मध्ये काम करत होता. गुरुग्राम इथं त्याने फ्लॅट रेंटने घेतला होता. त्याचं काही दिवसांपूर्वीच लग्न ठरलं होतं. त्याने आपल्या प्रेयसीला फ्लॅटवर बोलावलं होतं. पण, त्याच रात्री लैंगिक शक्ती वाढवण्याच्या गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनामुळे त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी गोळ्याही जप्त केल्या असून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवल्या आहे. गोळ्यांचा अहवाल समोर आल्यावर मृत्यूचं खरं कारण समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

लैंगिंक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांमुळे जीव जाऊ शकतो?

लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी सध्या सर्रास मार्केटमध्ये या ना त्या नावाने गोळ्या सहज मिळतात. त्यामुळे तरुण या गोळ्यांच्या आहारी गेले आहे. लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी गोळ्यांचा वापर हा फॅशनसारखा झाला आहे. पण, या गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनामुळे ब्लड प्रेशर कमी होतं, डोके दुखी, ह्रदयाची धडधड वाढणे अशी लक्षण लगेच दिसून येतात. बऱ्याच वेळा या गोळ्यांवर लिहिलेलं सुद्धा असतं. एवढंच नाहीतर डोळ्याची दृष्टी आणि ऐकणी शक्ती सुद्धा कमी होऊ शकते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे अशा गोळ्या या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या पाहिजे, असं डॉक्टरांकडून सांगितलं जात असतं.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts