Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • भोंदू गडगेला लिव्हरमधील इन्फेक्शन दिसलं? भोंदुगिरीचा कळस..
Top News

भोंदू गडगेला लिव्हरमधील इन्फेक्शन दिसलं? भोंदुगिरीचा कळस..

fake godman liver infection claim
fake godman liver infection claim : संगमनेरमधला भोंदू बाबा गडगे याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात गडगेला लिव्हरमधलं इन्फेक्शन दिसतंय. त्याचा हा व्हिडिओ बघून अनेकांची अक्कल गुंग होईल… हे भोंदू नेमकं आपल्याला कसं फसवतात आणि आपणही कसं भुलतो. भक्ती आणि श्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा आणि असहायतेचा फायदा घेणाऱ्या स्वयंघोषित ‘भोंदू’ बाबांचा सुळसुळाट थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील दत्तधाम येथील तथाकथित महाराज राजेंद्र गडगे याच्या अघोरी कारनाम्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विज्ञानाला आव्हान देणारे दावे आणि भक्तांना मानसिक गुलाम बनवण्याचे त्याचे तंत्र आता पोलीस तपासात उघड होत आहे.

लिव्हरचे इन्फेक्शन झाल्याचे तो ‘दिव्यदृष्टीने’ ओळखतो

राजेंद्र गडगे याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो अत्यंत धक्कादायक दावा करताना दिसत आहे. एका भक्ताला लिव्हरचे इन्फेक्शन झाल्याचे तो ‘दिव्यदृष्टीने’ ओळखतो आणि त्यानंतर सुरू होतो अंधश्रद्धेचा खेळ. मंत्रोच्चार करून आणि हाताच्या विशिष्ट हालचाली करून गडगे असा दावा करतो की, त्याने भक्ताच्या शरीरातील ते इन्फेक्शन स्वतःकडे खेचून घेतले आहे. “दत्तप्रभूंच्या शक्तीने हे शक्य झाले आहे,” असे सांगून तो जमलेल्या भाविकांना संमोहित करण्याचा प्रयत्न करतो.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचे लक्ष वेधले

या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी संताप व्यक्त केला असून, अशा अघोरी प्रकारांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याचे म्हटले आहे. केवळ शारीरिक व्याधीच नाही, तर लोकांच्या खासगी आयुष्यात काय चालले आहे, हे ओळखण्याचा दावाही हा भोंदू बाबा करायचा. भक्तांच्या मनामध्ये प्रवेश करून त्यांच्या घरातील गुप्त गोष्टी सांगणे, मनातील विचारांचे ‘कपाट’ उघडून दाखवणे, असे दावे करून तो भाविकांमध्ये आपली दहशत निर्माण करायचा. दैवी शक्ती असल्याचा आव आणून त्याने अनेक कुटुंबांवर आपली पकड मजबूत केली होती. सोशल मीडियावर त्याचे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याकडे पोलिसांचे लक्ष वेधले.

विरोधा नरबळी, अघोरी पुजा आणि जादूटोणा प्रतिबंध गुन्हा दाखल

या गंभीर प्रकाराची दखल घेत संगमनेर पोलीस ठाण्यात राजेंद्र गडगे याच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबतचा गुन्हा दाखल केलाय, त्याची कसून चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. केवळ काही वर्षांतच या बाबाने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. त्याचे अलिशान आश्रम, वाहने आणि जमिनी आता पोलिसांच्या रडारवर आहेत. ही माया नेमकी कुठून आली आणि यामध्ये आणखी कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

डोकं ठिकाणावर ठेवून अशा बाबांकडे जाणं टाळलं पाहिजे

गडगे याची पोलीस कोठडी संपत आली असून, तपासाची व्याप्ती वाढवण्यासाठी संगमनेर तालुका पोलीस न्यायालयाकडे पुन्हा कोठडीची मागणी करणार आहेत. अजून अनेक पीडित समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गडगे याने केवळ संगमनेरच नव्हे, तर बाहेरील जिल्ह्यातील लोकांचीही फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी आवाहन केले आहे की, जर कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, तर त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार नोंदवावी. श्रद्धेच्या नावाखाली चालणारा हा गोरखधंदा मोडून काढण्यासाठी लोकांनीच आपलं डोकं ठिकाणावर ठेवून अशा बाबांकडे जाणं टाळलं पाहिजे…अन्यथा अनेक गडगे आणि खरात होतच राहतील…
img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts