Beed Election Result : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मस्साजोग आणि मरळवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला… मस्साजोगमध्ये स्वरूपानंद देशमुख तर मरळवाडीत दिवंगत सरपंच बापू आंधळेंच्या पत्नी दिपाली आंधळे ४३५ मतांनी विजयी झाल्या आहेत. दिपाली आंधळे यांनी विरोधक पद्मिनीबाई आंधळे यांचा पराभव केला. या निकालाची राज्यात जोरदार चर्चा होतेय.. परळीच्या मरळवाडीच्या ग्रामपंचायत पोट निवडणुकीकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलं होतं. कारण सरपंच बापू आंधळे यांचा क्रूरपणे खून करण्यात आला होता. त्यांच्या पत्नी दीपाली आंधळे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या…
बापू आंधळे यांच्या पत्नी दीपाली आंधळे विजयी
दिवगंत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी दीपाली आंधळे यांनी विरोधक पदमीनबाई आंधळे यांचा ४३५ मतांनी पराभव केला. दोघींमध्ये अतिशय चुरशीची निवडणूक होईल, असं वाटलं होतं. मात्र दीपाली आंधळे यांनी विरोधक पदमीनीबाई आंधळे यांचा तब्बल ४३५ मतांनी पराभव केल्यानं निवडणूक एकतर्फी झाली, असं म्हणता येईल…
संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
निवडणूक दिवंगत सरपंच बापू आंधळे यांच्या निधनानंतर झालेल्या रिक्त जागेसाठी होती. या पार्श्वभूमीवर सहानुभूतीची लाट आणि स्थानिक पाठिंबा मिळवत दीपाली आंधळे विजयी झाल्या. त्याच वेळी, मस्साजोग गावात सरपंच पदासाठी झालेल्या दुसऱ्या पोटनिवडणुकीत मात्र वेगळा निकाल लागला. तेथे स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला आणि अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला. मस्साजोग परिसरातील राजकीय घडामोडींमध्ये आंधळे कुटुंबासाठी हा मोठा विजय मानला जात आहे… या विजयामुळे मरळवाडी ग्रामपंचायतीवर आंधळे कुटुंबाचे वर्चस्व कायम राहिले आहे.
सरपंच बापू आंधळे यांचा गोळीबारात जागीच मृत्यू
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. दरम्यान, या गोळीबारामध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजलं.. बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.. खून झालेल्या आणि खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तींना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यभर तापलं होतं…
बबन गीते यांच्यावर बापू आंधळे यांची हत्या
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्यावर बापू आंधळे यांची हत्या केल्याचा आरोप आहे. 29 जून 2024 रोजी आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. बापू आंधळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सरपंच होते.. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी झाले असून त्यांनी मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव केला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासावर तर मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या नावावर मते मागितली होती. यात अखेर गावकऱ्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. तब्बल ९२ मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले आहेत.












