Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • मोठा भूकंप! २०२९ मध्ये शिंदे गट-भाजप स्वातंत्र्य लढणार? मंत्र्यांचे मोठं निधान
Top News

मोठा भूकंप! २०२९ मध्ये शिंदे गट-भाजप स्वातंत्र्य लढणार? मंत्र्यांचे मोठं निधान

Shinde BJP 2029 election
53

Shinde BJP 2029 election : राज्याच्या राजकारणातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गट आणि भाजप २०२९ च्या निवडणूका वेगवेगळ्या लढणार असल्याचं मोठं विधान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी केलं, त्यांच्या या विधानाला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दुजोरा दिला. त्यामुळे शिंदे सेनेच्या मनात आगामी निवडणकीची काय तयारी चालू आहे यांची झलक पाहायला मिळाली आहे. त्यामुळं शिंदे गटाने आत्तापासूनच एक ला चलो रे चा नारा दिल्याचे दिसून येत आहेत.

हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का? TMC च्या अंतर्गत सर्व्हेने बदलले चित्र, नेमकं काय घडलं…

“२०२९ मध्ये भाजप किंवा शिवसेना स्वतंत्र्य लढू शकते. आपण शिवसेना आणि भाजप युती तुटताना पाहिलेलं आहे. कधीही कुणाचेही कोणतेही शाश्वत राजकारण नसते. अनेक युती अशा झाल्या आहेत की, त्या आपण कधी स्वप्नातही पाहू शकल्या नसतील. आपला पक्ष मजबूत करणे हा सर्वात मोठा उपाय आहे. आमची भूमिक महायुती सोबत लढण्याची आहे, मात्र प्रत्येक पक्षाची स्वातंत्र्य ताकत असते आणि ती वेगवेगळे लढल्यासिवाय दिसून येत नाही,” असे छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत संजय शिरसाठ म्हणाले.

मंत्री शिरसाठ यांच्या भूमिकेला उदय सामंताचा पाठिंबा

शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनीही या विधानाला दुजोरा दिला आहे. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मित्रपक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. संजय शिरसाट पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने बोलले त्यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं विधान केले. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप वेगळे होणार का? आणि २०२९ ची विधानसभा स्वातंत्र्य लढणार का? याबाबत चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत दोन्ही मंत्र्यांच्या विधानाची हवाच काढून घेतली.

शिवसेनेत बोलण्याचा अधिकार फक्त शिंदेंना – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांना शिवसेना भाजप २०२९ साली वेगवेगळे लढणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री यांनी, ‘मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदे यांना आहे. त्यांनी याबाबत एखादं विधान केलं तर मला तुम्ही त्यावर विचारा, इतर लोक बोलले तर त्याबद्दल आमच्या प्रवक्त्यांना विचारा’ असं म्हणत या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts