Census 2027 : भारताच्या विकासाला आकार देणारा एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या 2027 च्या जनगणनेची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया आता डिजिटल पद्धतीनं पार पाडली जात आहे. 1 एप्रिल 2026 पासून, देशात प्रथमच नागरिकांना डिजिटल स्वयं-गणना सुविधेद्वारे स्वतःची माहिती नोंदवण्याची संधी दिली जाईल.
हेही वाचा : मोठा भूकंप! २०२९ मध्ये शिंदे गट-भाजप स्वातंत्र्य लढणार? मंत्र्यांचे मोठं
कशी करायची स्व-गणणा :
डिजिटल स्वयं-गणनेत नागरिक se.census.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे घरबसल्या आपल्या कुटुंबाची सविस्तर माहिती भरु शकतात. घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याच्या 15 दिवस आधीपर्यंत स्वयं-गणना पोर्टल खुलं राहील. डिजिटल पद्धतीनं स्वयं-गणना पूर्ण केल्यानं प्रशासकीय वेळ आणि संसाधनांची बचत होईल आणि देशाच्या विकासासाठी अधिक अचूक माहिती मिळेल. जनगणनेतून मिळणारी माहिती धोरण विकास, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, गृहनिर्माण आणि सामाजिक कल्याण कार्यक्रमांसाठी महत्त्वपूर्ण आहे. विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी या माहितीवर आधारित असते. त्यामुळे, अचूक आणि अद्ययावत माहिती देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य मानलं जातं.
डिजिटल स्वयं-गणनेचा कालावधी किती आहे :
स्व-गणना कालावधी 1 मे ते 15 मे 2026 पर्यंत आहे. या कालावधीत, नागरिक स्वतःबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दलची माहिती ऑनलाइन देऊ शकतील, तर कुटुंब सूची आणि कुटुंब गणना टप्पा 16 मे ते 14 जून 2026 पर्यंत चालेल. जर नागरिकांनी या कालावधीत स्वतःची माहिती भरली, तर पुढच्या वेळी भेट दिल्यावर प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल.
कशी आहे प्रक्रिया :
ही प्रक्रिया नागरिकांसाठी सोपी आणि वापरण्यास-सुलभ बनवण्यात आली आहे. हे करण्यासाठी, अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in/ ला भेट द्या आणि कुटुंबप्रमुखाचं नाव आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा. त्यानंतर, तुमची पसंतीची भाषा निवडा. मग, पिन कोडद्वारे तुमच्या घराचं अचूक स्थान शोधा.









