Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
क्रीडा

गुजरातनं घेतला परभवाचा बदला; गतविजेत्या आरसीबीचा एकहाती पराभव

163 धावा काढतांना गुजरातला नाकीनऊ, शेवटच्या षटकात मिळाला विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव

अहमदाबाद GT Beat RCB : आयपीएल 2026 च्या 42 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं गतविजेत्या आरसीबीचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीचा संघ केवळ 155 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, गुजरातनं केवळ 6 गडी गमावून 16व्या षटकापर्यंत लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र, या सामन्यानंतरही आरसीबी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम आहे, तर गुजरात पाचव्या स्थानावर आहे.

हेही वाचा : देशांतर्गत शेअर बाजारात अस्थिरता! सेन्सेक्स 583 अंकांनी घसरुन बंद; निफ्टीही

आरसीबीची फलंदाजी डळमळीत :

या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीचा संघ 19.2 षटकांत 155 धावांवर सर्वबाद झाला. आरसीबीकडून देवदत्त पडिक्कलनं सर्वाधिक 40 धावा केल्या, तर विराट कोहलीनं 28 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून 28 वर्षीय अर्शद खाननं गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत तीन बळी घेतले. जेसन होल्डर आणि रशीद खान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

गुजरातचा आरामात विजय :

लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरात टायटन्सनं शुभमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी करुन शानदार सुरुवात केली. सुदर्शन सहा धावा करुन बाद झाला आणि शुभमन गिलनंही 43 धावांवर आपली विकेट गमावली. त्यानंतर, जॉस बटलरनं 19 चेंडूंमध्ये 39 धावा करून तोच वेग कायम ठेवला. गुजरात टायटन्सनं 111 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर, राहुल तेवतिया आणि जेसन होल्डर यांनी सहाव्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. या सामन्यात होल्डरनं 12 धावा केल्या, तर राहुल तेवतियानं नाबाद 27 धावा करुन जीटीला विजय मिळवून दिला. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारनं तीन बळी घेतले, तर रोमॅरिओ शेफर्डनं दोन आणि सुयश शर्मानं एक बळी घेतला.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts