Breaking News :
  • Home
  • संस्कृती
  • प्रभु श्रीरामांच्या दर्शनाला जाणं होणार सोपं! मुंबई ते अयोध्या दरम्यान धावणार नवीन अमृत भारत ट्रेन; वाचा वेळापत्रक
ताज्या बातम्या

प्रभु श्रीरामांच्या दर्शनाला जाणं होणार सोपं! मुंबई ते अयोध्या दरम्यान धावणार नवीन अमृत भारत ट्रेन; वाचा वेळापत्रक

Amrit Bharat trainset
69

मुंबई Amrit Bharat Express : भारतीय रेल्वेनं सर्वसामान्य प्रवाशांसाठी मुंबईहून अयोध्या दरम्यान नवी रेल्वे सेवा सुरु केली आहे. मध्य रेल्वे एलटीटी-अयोध्या-एलटीटी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनची नियमित सेवा सुरु करणार आहे. ट्रेन क्रमांक 22111, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) -अयोध्या कॅन्ट साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस, 5 मे पासून धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 22112, अयोध्या कॅन्ट-एलटीटी साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस, 6 मे पासून सुरु होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 एप्रिल रोजी पहिल्या अमृत भारत ट्रेनला अधिकृतपणे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला होता.

हेही वाचा : अकोल्यात तीव्र उष्णतेची लाट येण्याचा इशारा; प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन

मुंबईहून दर मंगळवारी सुटणार :

नव्यानं सुरु होत असलेली एलटीटी-अयोध्या कॅन्ट-एलटीटी अमृत भारत एक्सप्रेस (साप्ताहिक) आता एलटीटी, मुंबई येथून दर मंगळवारी सुटेल. सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेली ही ट्रेन दर मंगळवारी सकाळी 7:55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:15 वाजता अयोध्या कॅन्ट इथं पोहोचेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 22112, साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस, दर बुधवारी दुपारी 1:50 वाजता अयोध्या कॅन्ट येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3:45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस इथं पोहोचेल.

कोणत्या स्थानकावर थांबणार ट्रेन :

दोन्ही दिशांना, ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, प्रतापगड आणि सुलतानपूर स्थानकांवर थांबेल. यामध्ये 8 स्लीपर क्लास डबे, 11 जनरल सेकंड क्लास डबे, एक पॅन्ट्री कार आणि 2 सेकंड सीटिंग व गार्ड ब्रेक व्हॅन डब्यांचा समावेश असेल.

अमृत भारत एक्सप्रेस ​​इतर गाड्यांपेक्षा वेगळी :

अमृत भारत एक्सप्रेस ही एक आधुनिक, परवडणारी लांब पल्ल्याची गाडी आहे, जिचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना प्रवासाचा उत्तम अनुभव देणं आहे. या गाडीची प्रवासी क्षमता जास्त आहे. यात 8 स्लीपर क्लास डबे आणि 13 जनरल सेकंड क्लास डबे असून, एकूण प्रवासी क्षमता 1800 पेक्षा जास्त आहे. ही गाडी ‘कवच’ प्रणालीनं सुसज्ज आहे. ‘पुश-पुल’ तंत्रज्ञान सुरक्षित प्रवासाची खात्री देते. प्रवेग कार्यक्षमतेमुळं प्रवासाचा वेळ कमी होतो. जर्की ब्रेकिंगमुळं प्रवाशांना आरामदायक अनुभव मिळतो. ही गाडी अग्निरोधक पडद्यांनी सुसज्ज असून, शौचालयं आणि इलेक्ट्रिकल क्युबिकल्समध्ये एरोसोल-आधारित अग्निशमन प्रणाली बसवण्यात आली आहे.

प्रवाशांना हायटेक सुविधा :

प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षिततेसाठी एलईडी प्रकाशयोजना, एर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या जागा आणि प्रत्येक सीट/बर्थवर मोबाईल चार्जिंग पॉईंट्सचा समावेश आहे. सीसीटीव्ही निगराणी आणि सार्वजनिक घोषणा/प्रवासी माहिती प्रणालीची सोय करण्यात आली आहे. ही गाडी दिव्यांगांसाठी अनुकूल शौचालयांसह अनेक सुविधांनी सुसज्ज आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts