Comercial LPG Cylinder : मे महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईमुळं सामान्य नागरिक आणि व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. कारण व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ₹993 ची मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि लहान व्यवसायांवर होईल. तसंच सामान्य लोकांच्या खिशावरही अप्रत्यक्षपणे याचा परिणाम होईल. दिलासादायक बाब म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हेही वाचा : अजित पवारांच्या निकटवर्तीय माजी आमदारांचे निधन; आज पहाटे हृदयविकाराचा आला
किती असेल नवीन किंमत :
नवीन दरांनुसार, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत पूर्वीच्या ₹2078.50 वरुन आता ₹3071.50 झाली आहे. मुंबईत हा दर ₹3024 वर पोहोचला आहे, तर कोलकातामध्ये तो ₹3202 वर पोहोचला आहे. लखनऊ, पाटणा, जयपूर आणि चेन्नईसारख्या शहरांमध्येही अशीच दरवाढ दिसून आली आहे.
ओटीपीद्वारे होणार गॅस वितरण :
1 मे पासून गॅस वितरणाचे नियमही कडक करण्यात आले आहेत. आता सिलेंडर वितरणाच्या वेळी ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल, जो दाखवणं आवश्यक असेल. यामुळं फसवणुकीचे वितरण आणि बनावट वितरण टाळणं शक्य होईल. तसंच नव्या नियमांनुसार गॅस बुकिंगची वेळही वाढवण्यात आली आहे. शहरांमध्ये ही वेळ 21 दिवसांवरुन 25 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवस करण्यात आली आहे. तसंच अंतिम मुदतीपूर्वी केलेली बुकिंग सिस्टीमद्वारे आपोआप नाकारली जाईल.
खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता :
व्यावसायिक गॅसच्या दरवाढीमुळं हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचा खर्च वाढेल, ज्याचा परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतींवर होऊ शकतो. परिणामी, येत्या काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.












