Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • नसरापूर प्रकरणी चिमुकलीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून नवले पुलावर ठिय्या; सुनेत्रा पवारांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट, आरोपील तात्काळ फाशी देण्याची मागणी
Pune

नसरापूर प्रकरणी चिमुकलीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून नवले पुलावर ठिय्या; सुनेत्रा पवारांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट, आरोपील तात्काळ फाशी देण्याची मागणी

पुणे Nasrapur Murder Case : पुण्यातील नसरापूर इथं एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडितेच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी पुण्यात भेट दिली. या भेटीदरम्यान, पीडितेचं कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी पवार यांना आवाहन केलं की, आरोपीवर लवकरात लवकर खटला चालवून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी.

हेही वाचा : नसरापूर प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय म्हणाले?

आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी :

यावेळी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गर्दीसमोर बोलावून जनभावना व्यक्त केली. फडणवीस यांनी आश्वासन दिलं की, विशेष न्यायालयामार्फत या प्रकरणाची जलदगतीनं सुनावणी केली जाईल आणि आरोपीला जलद व कठोर शिक्षा मिळेल याची खात्री केली जाईल. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयानं या क्रूर आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवले पुलावर नातेवाईकांचं आंदोलन :

दरम्यान या घटनेमुळं नातेवाईक आक्रमक झाले असून त्यांनी पुण्याच्या नवले पुलावर ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका चिमुरडीच्या नातेवाईकांनी घेतली आहे. चिमुरडीच्या नातेवाईकांनी केलेल्या आंदोलानमुळं पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प झाला असून या ठिकाणी गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. नवले पुलावर या चिमुरडीचे प्रेत ठेवण्यात आले असून तिला न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा, पण आम्ही न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

काय आहे घटना :

ही घटना काल पुण्यातील नसरापूर गावात घडली. प्राथमिक माहितीनुसार, मुलगी दुपारी बेपत्ता झाली आणि तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला. शोधादरम्यान, मुलीचा छिन्नविछिन्न आणि रक्तानं माखलेला मृतदेह सापडला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी, एक वृद्ध व्यक्ती, त्या लहान मुलीला घेऊन जाताना दिसला, ज्यामुळं पोलिसांना त्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यास मदत झाली.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts