• Home
  • राजकारण
  • सुनेत्रा पवार बारामतीत ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; भावनिक पोस्ट करत म्हणाल्या…
Top News

सुनेत्रा पवार बारामतीत ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; भावनिक पोस्ट करत म्हणाल्या…

sunetra pawar 6

बारामती Sunetra Pawar Emotional Post : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार, सुनेत्रा पवार प्रचंड मताधिक्यानं विजयी होण्याच्या मार्गावर आहेत. सध्याच्या कलानुसार सुनेत्रा पवार 70 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहे, त्यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जातोय. त्यांनी हा विजय आणि जनतेचा विश्वास अजित पवार यांना समर्पित केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक भावनिक पोस्ट टाकली आहे. विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा : सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल, राजकीय आव्हाने आणि समिकरणे जमणार?

सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन :

सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निमित्तानं, तुम्ही सर्वांनी तुमच्या मतांद्वारे जो विश्वास दाखवला आहे, तो मी पूजनीय अजितदादांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करते. आज हा निकाल जाहीर झाल्यानं, पूजनीय दादांच्या आठवणी उजळून निघाल्या आहेत आणि आम्ही सर्व भावूक झालो आहोत. दादांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी नम्रपणे विनंती करते की, हा विजय साजरा करण्यासाठी कोणत्याही मिरवणुका काढू नका किंवा गुलाल फेकू नका. आपण संयम बाळगूया आणि दादांच्या आदर्शांनुसार वागूया.”

‘हा शेवट नाही, ही तर सुरुवात आहे’ :

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढं लिहिलं, “बारामतीच्या त्या सर्व लोकांचे मी मनःपूर्वक आभार मानते, ज्यांनी मला दादांच्या स्वप्नातील बारामती साकारण्याची संधी दिली. हा शेवट नाही; ही तर केवळ सुरुवात आहे. दृढनिश्चयाची, संघर्षाची आणि एका नव्या बारामतीची!”

अजित पवारांच्या जागेवर निवडणुक :

अजित पवार यांच्या निधनानंतर, सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर, त्या त्यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पवार यांच्या व्यतिरिक्त, या जागेवर इतर 23 उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. मात्र सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय निश्चित दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts