Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बारामतीत सुनेत्रा पवारांचा विक्रमी मतांनी विजय; अजित पवारांचा जुना विक्रम मोडला
Top News

बारामतीत सुनेत्रा पवारांचा विक्रमी मतांनी विजय; अजित पवारांचा जुना विक्रम मोडला

बारामती DCM Sunetra Pawar : राज्यातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 2019 मधील मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड मोडून काढत मताधिक्क्याचा नवा रेकॉर्ड बनवला आहे. मतमोजणीच्या 24 फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार 2 लाख 18 हजार 930 इतक्या विक्रमी मताधिक्यानं विजयी झाल्या आहेत.

हेही वाचा : सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल, राजकीय आव्हाने आणि समिकरणे जमणार?

देशात सगळ्यात जास्त मताधिक्क्यानं निवडून येण्याचा विक्रम :

देशात सगळ्यात जास्त मतांनी निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावानं आज झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, जय पवार आणि पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी निवडणून देण्याचं आवाहन केलं होतं, त्याचबरोबर सर्व पक्षांनी आणि संघटनांनी देखील सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला होता, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवाराला हजारापेक्षा जास्त मतं देखील पडली नसल्याचं दिसून येत आहे.

सुनील कुमार शर्मांचा विक्रम मोडला :

बारामती पोट निवडणुकीतील सर्व मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना मिळालेलं हे मताधिक्य आतापर्यंत देशातील सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आधी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा हे 2022 साली 2 लाख 14 हजार 835 मताधिक्यानं विजयी झाले होते. आता आज सुनेत्रा पवारांनी त्यांचा विक्रम मोडला असल्याचं सांगितलं जातंय.

सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन :

दरम्यान सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निमित्तानं, तुम्ही सर्वांनी तुमच्या मतांद्वारे जो विश्वास दाखवला आहे, तो मी पूजनीय अजितदादांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करते. आज हा निकाल जाहीर झाल्यानं, पूजनीय दादांच्या आठवणी उजळून निघाल्या आहेत आणि आम्ही सर्व भावूक झालो आहोत. दादांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी नम्रपणे विनंती करते की, हा विजय साजरा करण्यासाठी कोणत्याही मिरवणुका काढू नका किंवा गुलाल फेकू नका. आपण संयम बाळगूया आणि दादांच्या आदर्शांनुसार वागूया.”

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts