• Home
  • राजकारण
  • दूधापासून ते राशनपर्यंत! 43 दिवस फरार असलेल्या नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानला मदत कोण करत होतं?
Top News

दूधापासून ते राशनपर्यंत! 43 दिवस फरार असलेल्या नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानला मदत कोण करत होतं?

nidha khan

Nida Khan Update: नाशिक धर्मातर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान ४३ दिवस फरार होती. अखेर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली असून, फरारी काळात तिला नेमकं कोण मदत करत होते जाणून घेऊयात.

नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला अखेर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. तब्बल ४३ दिवस ती पोलिंसाच्या नजरेआड राहिली होती. याकाळात तिला नेमकी कोणाची मदत मिळत होती, याचा तपास आता विशेष तपस पथकांकडून (SIT) सुरू आहे.

हेही वाचा: ११ मे! आजचा दिवस ठरणार काही राशींसाठी खास! सायंकाळी करा ‘हे’ उपाय; महादेवांच्या कृपेने उघडतील यशाचे नवे दरवाजे

फरार असताना मिळाली मदत?

प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नरेगाव परिसरातील एका फ्लॅट्मध्ये राहत होती. हा फ्लॅट एमआयएसशी संबंधित नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालकीचा असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या ठिकाणी राहण्यादरम्यान तिच्या कुटुंबासाठी दुधापासून ते महिन्याचं राशन चिकन तसेच इतर आवश्यक वस्तू पुरवल्या जात असल्याची माहितीही समोर आली आहे. ही व्यवस्था नगरसेवकाच्या ड्रायव्हरमार्फत केली जात होती, असा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांची गुप्त मोहीम

नाशिक पोलिसांनी या कारवाईसाठी अत्यंत गुप्त पद्धतीने योजना आखली होती. नाशिकमधील वाहनांवारून संशय येऊ नये म्हणून इतर जिल्ह्यांतील खासगी वाहनांचा वापर करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षण चेतन श्रीवंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने साध्या वेशात तीन दिवस परिसरात मुक्काम केला होता. स्थानिकांना कोणतीही कल्पना येऊ नये म्हणून पोलिसांनी मोबाईल ट्रॅकिंगपेक्षा मानवी गुप्त माहितीवर अधिक भर दिला. अखेर 7 मे रोजी निदा खानला अटक करण्यात यश आले.

आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची शक्यता

फरार आरोपीला लपवून ठेवणे आणि मदत करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे निदा खानला आर्थिक मदत किंवा निवार कोणी दिला, याचा तपास आता आर्थिक वेगाने सुरू आहे. SIT कडून नगरसेवक मतीन पटेल. त्यांचा ड्रायव्हर तसेच निदाच्या काही नातेवैकांबाबत माहिती गोळा केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते.

मोठ्या नेटवर्कचा शोध

निदा खानच्या अटकेनंतर या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू झाला आहे. तिला 43 दिवस सुरक्षितपणे लपवून ठेवण्यासाठी कोणते नेटवर्क सक्रिय होते, हे उघड करणे आता पोलिसांसमोरचे मोठे आव्हान मानले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts