Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • सोनं भारतात येतं कुठून? रोज किती विक्री होते आणि एक वर्ष खरेदी थांबली तर अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम होईल?
Top News

सोनं भारतात येतं कुठून? रोज किती विक्री होते आणि एक वर्ष खरेदी थांबली तर अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम होईल?

Gold Import India: नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या खरेदीसंदर्भात एक महत्वाचं आवाहन केलं आहे. यानंतर भारतात नेमकं सोनं कुठून येतं, दररोज किती खरेदी होतं आणि जर सोन्याची खरेदी पूर्णपणे थांबली तर त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, असे अनेक प्रश्न चर्चेत आले आहेत, चला तर मग, जाणून घेऊया सविस्तर माहिती.

भारतामध्ये सोने हे केवळ दागिन्यांपुरतं मर्यादित नसून ते परंपरा, गुंतवणूक आणि सुरक्षित संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. लग्नसमारंभ, सण आणि आर्थिक गुंतवणूक या सगळ्यात सोन्याला विशेष महत्व आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या खरेदीबाबत एक महत्वाचं आवाहन केलं आहे. यानंतर भारतात सोनं नेमकं कुठून येतं, दररोज किती खरेदी होतं आणि जर सोन्याची खरेदी पूर्णपणे थांबली तर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, असे अनेक प्रश्न चर्चेत आले आहेत.

हेही वाचा: दूधापासून ते राशनपर्यंत! 43 दिवस फरार असलेल्या नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानला मदत कोण करत होतं?

भारतात सोनं कुठून येतं?

देशांतर्गत सोन्याचं उत्पादन अत्यंत कमी असल्यामुळे भारताला बहुतांश सोने आयात करावं लागतं. दरवर्षी सुमारे ८०० ते ९०० टन सोन्याची मागणी असते, पण देशात खाणकाम खूपच मर्यादित आहे.

भारत सोनं मुख्यतः या देशांतून आयात करतो

स्वित्झर्लंड – सर्वात मोठा पुरवठादार
संयुक्त अरब अमिराती (UAE)
दक्षिण आफ्रिका
पेरू
हाँगकाँग आणि इतर देश

भारतात दररोज किती सोनं खरेदी होतं?

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार भारतात दररोज साधारण २ ते २.२ टन सोनं खरेदी केलं जातं. याची किंमत हजारो कोटी रुपयांमध्ये जाते. यामध्ये मोठा हिस्सा दागिन्यांचा असतो, तर काही प्रमाणात नाणी आणि बिस्किटांच्या स्वरूपात गुंतवणूक केली जाते.

सोन्याची मागणी का जास्त आहे?

भारतात दरवर्षी लाखो विवाहसोहळे होतात, जिथे सोनं अनिवार्य मानलं जातं
दिवाळी आणि अक्षय तृतीया सारख्या सणांना खरेदी वाढते
सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्वामुळे मागणी सतत कायम राहते
जर एक वर्ष सोनं खरेदीच केलं नाही तर काय होईल?

तज्ज्ञांच्या मते, जर भारतात एका वर्षासाठी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात थांबली तर काय होईल.

सोन्याची आयात कमी होईल

परकीय चलनाचा (foreign exchange) मोठा खर्च वाचेल
व्यापार तुटीवर सकारात्मक परिणाम होईल
रुपयावरचा दबाव कमी होऊ शकतो
लोक शेअर्स, बाँड्स आणि बँक डिपॉझिट्ससारख्या पर्यायांकडे वळू शकतात.

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts