Mumbai Indians: मुंबई इंडियन्स संघात पुन्हा एकदा अंतर्गत मतभेदांच्या चर्चांनी जोर धरला आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील संबंधांबाबत सोशल मीडियावर विविध दावे आणि अफवा पसरत असून, यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या सोशल मीडिया (Social Media) अॅक्टिव्हिटीमुळे चर्चाना उधाण आले हाये. काही यूजर्सनी दावा केला की त्याने इंस्टाग्रामवर संघांशी संबंधित काही अकाउंट्स अनफॉलो केले होते, मात्रनंतर पुन्हा परिस्थिती बदलल्याचेही सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही, त्यामुळे याबाबत विविध अफवा सोशल मीडियावर पसरताना दिसत आहे.
हेही वाचा: पेट्रोल बचतीपासून ऑनलाइन क्लासेसपर्यंत; मोदींचे देशवासियांना 10 मोठे आवाहन
रोहित-हार्दिक संबंधांवर पुन्हा प्रश्नचिन्ह
आणखी एक दावा असा करण्यात येत आहे की हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फॉलोइंग लिस्टमधून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव यांची नावे दिसत नाहीत. यामुळे चाहत्यांनी संघातील अंतर्गत संबंधांबाबत पुन्हा चर्चा सुरू केली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
सोशल मीडियावर चर्चांचा स्फोट
या सर्व घटनांनंतर सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. काही चाहते याला संघातील मतभेदांशी जोडत आहेत, तर काही जण याला फक्त अफवा असल्याचं सांगत आहेत.
संघाच्या कामगिरीवरही परिणामाची चर्चा
दरम्यान, मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सध्याची कामगिरीही चर्चेत आहे. काही सामन्यांतील पराभवांनंतर संघाचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाल्याचं मानलं जात आहे. यामुळे आधीच सुरू असलेल्या चर्चांना आणखी हवा मिळत आहे.
अधिकृत प्रतिक्रिया प्रतीक्षेत
या संपूर्ण प्रकरणावर मुंबई इंडियन्स किंवा संबंधित खेळाडूंकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी या चर्चा केवळ सोशल मीडिया पुरत्याच मर्यादित आहेत. (IPL 2026 news)












