Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • “अरेरे…माझी चूक झाली, मी कधी कधी…”, राम चरणने मध्यरात्री मागितली जसप्रीत बुमराहची माफी, नेमकं घडलं काय?
Top News

“अरेरे…माझी चूक झाली, मी कधी कधी…”, राम चरणने मध्यरात्री मागितली जसप्रीत बुमराहची माफी, नेमकं घडलं काय?

bumrah ram charan
62

Ram Charan | सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) चांगलाच चर्चेत आला आहे. नुकताच राम चरणच्या ‘पेड्डी’ (Peddi) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘पेड्डी’ हा चित्रपट एक स्पोर्ट्सवर आधारित असून यामध्ये राम चरण विविध भूमिकांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तो कुस्ती, क्रिकेट या खेळांमध्ये पारंगत असलेल्या एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे. तर नुकताच भोपाळमध्ये ‘पेड्डी’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमादरम्यान राम चरणकडून एक मोठी चूक झाली, ज्यामुळे त्याला मध्यरात्री भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) माफी मागावी लागली.

हेही वाचा – होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा, इराणसोबतचा करार अंतिम टप्प्यात

राम चरणने जसप्रीत बुमराहची का मागितली माफी?

‘पेड्डी’ चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यादरम्यान जेव्हा राम चरण मंचावर आला तेव्हा सूत्रसंचालकाने त्याच्यासोबत एक रॅपिड-फायर राऊंड घेतला. यावेळी सूत्रसंचालकाने राम चरणला क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारले. त्याला अनेक क्रिकेटपटूंची नावे देऊन त्यांच्याबद्दल आपले विचार मांडण्यास सांगितले. यादरम्यान जेव्हा सूत्रसंचालकाने सचिन तेंडुलकरचा उल्लेख केला, तेव्हा राम चरण म्हणाला की, त्यांची कारकीर्द खूपच मोठी आहे. त्यानंतर सूत्रसंचालकाने महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख केला, त्यावर राम चरणने धोनीच्या शांत आणि संयमी स्वभावाचे कौतुक केले.

पुढे रोहित शर्माचे नाव घेतले गेले, तेव्हा राम चरणने त्याला आपला आवडता क्रिकेटपटू म्हटले. नंतर विराट कोहलीचे नाव घेताच तो तर फायर आहे, असं राम चरण म्हणाला. त्यानंतर शेवटी जेव्हा जसप्रीत बुमराहचे नाव घेतले गेले, तेव्हा राम चरण म्हणाला, जसप्रीत बुमराहजी, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. मला फुटबॉल खूप आवडतो आणि तुम्ही फुटबॉलला खूप पुढे नेत आहात… लव्ह यू, सर. राम चरणने जसप्रीत बुमराहला भारतीय फुटबॉलपटू जसप्रीत सिंग समजण्याची चूक केली आणि तो गोंधळात पडला.

जेव्हा राम चरणना हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा राम चरणने मध्यरात्री जसप्रीत बुमराहची ट्वीट करून माफी मागितली. त्याने ट्विट करत आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “अरेरे… मी कधीकधी नावे विसरतो. जसप्रीत बुमराह जी, माझ्या चुकीबद्दल मी माफी मागतो. उत्साहाच्या आणि गर्दीच्या वातावरणात झालेली ही एक मानवी चूक होती. मी तुमचा खूप आदर करतो आणि तुमच्या खेळाचा खूप मोठा चाहता आहे. जेव्हा तुम्ही सातत्याने फलंदाजांना बॅकफूटवर ढकलता, तेव्हा तुम्ही प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावता”, असं राम चरणने म्हटलं आहे.

दरम्यान, राम चरणचा ‘पेड्डी’ हा चित्रपट 4 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राम चरणसोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच रवी किशन, दिव्येंदू शर्मा, शिव राजकुमार, जगपती बाबू आणि बोमन इराणी हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts