Delhi Crime | दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा हादरवणारी घटना घडली आहे. एका खाजगी बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना ( Delhi Rape Case) घडली आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांना या घटनेची माहिती दिली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेनं संपूर्ण दिल्लीत एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.
हेही वाचा – भिंती कोसळल्या, झाडे पडली… उत्तर प्रदेशात वादळाचा कहर; 37 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली लोक गाडल्याने खळबळ
दिल्लीत नेमकं घडलं काय?
दिल्लीतील या घृणास्पद घटनेसंदर्भात पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित महिलेला जबरदस्ती राणी बाग परिसरातून उचलून बसमध्ये बसवले. त्यानंतर ते तिला नांगलोई परिसरात घेऊन गेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. दिल्ली पोलिसांनी या घटनेसंदर्भात राणी बाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सामूहिक बलात्काराची ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुले आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. मिळालेल्या माहितीनुसार, बस बिहारमध्ये नोंदणीकृत होती आणि ही घटना दिल्लीच्या राणीबाग परिसरात घडली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तातडीने कारवाई करत बस चालक आणि वाहकाला अटक केली. दिल्ली पोलिसांनी या घटनेत वापरलेली बसही जप्त केली आहे.
ज्या बसमध्ये पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार झाला ती एक खाजगी बस असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई करत गुन्ह्यात वापरलेली बस जप्त केली आहे. तसेच या प्रकरणातील बसचा चालक आणि वाहक या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, दिल्लीत घडलेल्या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेक लोकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.











