Breaking News :
  • Home
  • देश
  • अमेरिकेचा दहशतवादाविरोधात अॅक्शन मोड; ISIS च्या टॉप कमांडरचा केला खात्मा
Top News

अमेरिकेचा दहशतवादाविरोधात अॅक्शन मोड; ISIS च्या टॉप कमांडरचा केला खात्मा

trump 2
58

Donald Trump | जागतिक दहशतवादाविरोधात अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. दहशतावाविरोधात अमेरिका अॅक्शन मोडमध्ये आली असून त्यांनी आयसिसचा (ISIS) सर्वोच्च कमांडर अबू-बिलाल अल-मिनुकी (Abu-Bilal-Al-Minuki) याचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे या कारवाईची माहिती दिली.

हेही वाचा – भररस्त्यात उभे राहिले अन् धडाधड गोळ्या झाडल्या…, बिश्नोई गँगचा पुण्यात रात्रीच्या अंधारात थरार; नेमकं घडलं तरी काय?

अमेरिकेची जागतिक दहशतवादाविरोधात मोठी कारवाई

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, त्यांच्या आदेशानुसार अमेरिकी सैन्य आणि नायजेरियन सैन्याने एका संयुक्त कारवाईत एक अत्यंत कठीण मोहीम पार पाडली. अबू-बिलाल अल-मिनुकी हा आयसिसचा दुसऱ्या क्रमांकाचा जागतिक कमांडर होता आणि तो आफ्रिकेतील एका सुरक्षित ठिकाणाहून दहशतवादी कारवाया चालवत होता. तर अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना अल-मिनुकीच्या ठिकाणाबद्दल आणि हालचालींबद्दल माहिती होती, ज्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली गेली.

अबू-बिलाल अल-मिनुकी आफ्रिकेतील दहशतवादात आणि अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करण्याच्या कटात सामील होता. त्यामुळे अमेरिकेने मोठी कारवाई केली ज्यात अल-मिनुकीचा खात्मा केला. तर अल-मिनुकीच्या हत्येनंतर आयसिसच्या जागतिक नेटवर्कला आणि कार्यक्षमतेला मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई करण्यासाठी आधीच प्लॅन तयार करण्यात आला होता ज्यामध्ये अमेरिकेच्या गुप्तचर संस्था, विशेष दल आणि नायजेरियन सुरक्षा दलांचा सहभाग होता. तर या कारवाईमुळे आयसिसच्या दहशतवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts