Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • भररस्त्यात उभे राहिले अन् धडाधड गोळ्या झाडल्या…, बिश्नोई गँगचा पुण्यात रात्रीच्या अंधारात थरार; नेमकं घडलं तरी काय?
Pune

भररस्त्यात उभे राहिले अन् धडाधड गोळ्या झाडल्या…, बिश्नोई गँगचा पुण्यात रात्रीच्या अंधारात थरार; नेमकं घडलं तरी काय?

Pune Bishnoi Gang Firing | पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) लॉरेन्स बिश्नोई गँगची (Lawrence Bishnoi Gang) दहशत पहायला मिळाली. एकिकडे पुण्यात कोयता गँगची दहशत असतानात आता लॉरेन्स बिश्नोईचा देखील थरार पहायला मिळाला. काल मध्यरात्री पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही शार्प शुटर्सनी भररस्त्यात जोरदार गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – नितीन गडकरींना 100 कोटींची खंडणी मागणं पडलं महागात, आरोपी भोगावा लागणार 5 वर्षांचा तुरूंगवास

पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही शार्प शुटर्सनी रात्री 9:20 च्या सुमारास भररस्त्यात एका फर्निचर मॉलवर गोळीबार केला. यावेळी आरोपींनी पाच ते सहा राऊंड फायर करत गोळीबार केला. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य शुभम लोणकरच्या शूटरने फर्निचर मॉलवर गोळीबार केला. या गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दुचाकीवरून दोन आरोपींनी येत मॉलच्या दिशेने पाच ते सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या गोळीबारात मॉलची काच फुटली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करण्यास सुरूवात केली आहे.

आरोपींनी फक्त गोळीबारच नाही केला तर फर्निचर मॉलच्या मालकाला धमकी देखील दिली आहे. ‘एजे’ फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन हे एमडी ड्रग्स तस्कर असल्याचा उल्लेख करत हा फक्त ट्रेलर आहे नंतर गोळी थेट डोक्यात असेल, अशी थेट धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरूवात केली असून गोळीबार केलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी आपली पथके रवाना केली आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts