Maharashtra Legislative Council Voting | महाराष्ट्रात (Maharashtra) लवकरत निवडणुकांची धामधूम सुरू होणार आहे. कारण नुकतेच भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) 16 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सोबतच नागपूर पोटनिवडणूकीची (Nagpur by-election) तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा – पश्चिम बंगालला हादरवणाऱ्या आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी कधी होणार मतदान?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व जागांसाठी 18 जून 2026 रोजी एकाच वेळी मतदान होणार आहे. तर 22 जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग 25 मे रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करेल. तसेच उमेदवार 1 जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करू शकतील. 2 जून रोजी मतांची छाननी होईल आणि 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १८ जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होईल. मतदान पार पडल्यानंतर सोमवारी अर्थातच 22 जून रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया 25 जूनपर्यंत पूर्ण होईल.
नागपूर पोटनिवडणुकीची तारीखही जाहीर, कधी होणार मतदान?
भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठीही पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या जागेसाठी 18 जून 2026 रोजी मतदान होणार आहे. तर याचा निकाल 22 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्यानंतर 23 नोव्हेंबर 2024 रोजी ही जागा रिक्त झाली होती. तर या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.







