Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • अमेरिकेत मशिदीवर गोळीबाराचा थरार; 3 जण ठार, हल्ल्यानंतर आरोपींनी केलं धक्कादायक कृत्य
Top News

अमेरिकेत मशिदीवर गोळीबाराचा थरार; 3 जण ठार, हल्ल्यानंतर आरोपींनी केलं धक्कादायक कृत्य

Shooting At A Mosque In US | अमेरिकेत (US) एका मशि‍दीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील सॅन दिएगोमधील एका मशिदीवर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला . या गोळीबारात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं सॅन दिएगोमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – सोनं महागलं तर चांदी झाली स्वस्त; खरेदी करण्यापूर्वी तपासा आजचे नवे दर

अमेरिकेत नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सॅन दिएगोमधील एका मशिदीवर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू झाला. तर दोन्ही हल्लेखोर हे अल्पवयीन होते. या घटनेबाबत सॅन दिएगोचे पोलीस प्रमुख स्कॉट वॉल यांनी सांगितले की, सॅन दिएगोच्या इस्लामिक सेंटरवरील हल्ल्याची द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून चौकशी केली जात आहे. या घटनेला कारणीभूत ठरलेली परिस्थिती येत्या काही दिवसांत उघड केली जाईल. तसेच या घटनेनंतर त्या दोन्ही हल्लेखोरांनी आत्महत्या करत स्वतःला संपवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत सांगितलं की, सकाळी 09:45 च्या सुमारास एका किशोरवयीन मुलाच्या आईने पोलिसांशी संपर्क साधून तिचा मुलगा अनेक शस्त्रे आणि त्याचे वाहन घेऊन बेपत्ता झाला असल्याची माहिती दिली. तसेच त्या मुलाच्या आईला एक चिठ्ठी मिळाली होती. त्यांनी चिठ्ठीतील द्वेषपूर्ण भाषा होती. तर हल्ला करण्यापूर्वी सॅन दिएगोच्या इस्लामिक सेंटरला कोणतीही विशिष्ट धमकी देण्यात आली नव्हती. ज्या किशोरवयीन मुलाच्या आईने पोलिसांशी संपर्क साधला तो इस्लामिक सेंटरपासून सुमारे एक मैल अंतरावर असलेल्या मॅडिसन हायस्कूलचा विद्यार्थी होता. तर या किशोरवयीन मुलाने आणि आणखी एका त्याच्या साथीदाराने मिळून मशि‍दीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर या दोन्ही हल्लेखोरांनी आत्महत्या करत स्वत:ला संपवलं.

या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये मशिदीच्या एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितंल की, हा हल्ला आणखी भीषण होण्यापासून रोखण्यात त्या रक्षकाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्या सुरक्षा रक्षकाने दाखवलेल्या धाडसाने आज अनेकांचे प्राण वाचले आहेत, असं पोलीस म्हणाले. दरम्यान, सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून हल्लेखोरांनी मशि‍दीवर गोळीबार का केला? याचा पोलीस शोध घेत आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts