Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • केस धुतल्यानंतर लगेच करू नका ‘ही’ चूक; नाहीतर केसांचं होईल नुकसान
Top News

केस धुतल्यानंतर लगेच करू नका ‘ही’ चूक; नाहीतर केसांचं होईल नुकसान

Hair Care Tips | आपल्या केसांना चमकदार, मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण शॅम्पूनंतर लगेच तेल लावतात. काहींना वाटतं की यामुळे केसांना अधिक पोषण मिळतं, पण प्रत्यक्षात ही सवय केसांसाठी हानिकारक ठरू शकते. शॅम्पूनंतर लगेच तेल लावल्याने केस चिकट होणे, धूळ साचणे आणि टाळूशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांची योग्य काळजी कशी घ्यावी आणि तेल लावण्याची योग्य वेळ कोणती? याबाबत आता आपण जाणून घेऊया.

टाळूवर साचू शकते घाण – शॅम्पूने केस धुतल्यानंतर फक्त आपले केसच नाही, तर टाळू देखील स्वच्छ होतो. पण बरेच लोक शॅम्पूने केस धुतल्यानंतर लगेच टाळूला तेला लावतात. शॅम्पू लावल्यानंतर लगेच टाळूला तेल लावल्याने तेलाच्या थराखाली ओलावा जमा होऊ शकतो, यामुळे टाळूचे संतुलन बिघडते आणि जिवाणूंची वाढ होते. त्यामुळे डोक्यात खाज सुटणे, जळजळ होणे किंवा कोंडा होणे अशा समस्या निर्माण होतात.

केस चिकट होतात – केस धुतल्यानंतर लगेच केसांना तेल लावल्याने केस चिकट दिसतात. याचं मुख्य कारण म्हणजे केसांना सुकण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नसतो. ज्यावेळी केस ओले असतात तेव्हा तेल केसांच्या पृष्ठभागावर जमा होते आणि शॅम्पू, कंडिशनरच्या उरलेल्या अवशेषांसोबत मिसळून एक तेलकट थर तयार होतो. यामुळे केस चमकदार दिसण्याऐवजी चिकट दिसू शकतात.

तेल शोषून घेत नाही – जेव्हा तुम्ही केस धुता तेव्हा लगेच तेल लावले तर अतिरिक्त पाणी तुमच्या केसांसाठी एक अडथळा निर्माण करते. तेल पाण्याच्या पृष्ठभागावरच राहते आणि टाळूमध्ये खोलवर शिरू शकत नाही. त्यामुळे तुमच्या केसांना पूर्ण पोषण मिळत नाही आणि ते चिकट वाटू लागतात. त्यामुळे केस ओले असताना तेल लावू नका.

केसांना तेल कधी लावावे?

त्यामुळे केस निरोगी आणि चमकदार ठेवायचे असतील तर तेल लावण्याची योग्य पद्धत आणि वेळ जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शॅम्पूपूर्वी केसांना तेल लावल्याने केसांना आवश्यक पोषण मिळते आणि ते कोरडे व कमकुवत होण्यापासून बचाव होतो. त्यामुळे पुढच्या वेळी केस धुताना शॅम्पूनंतर नव्हे, तर आधी तेल लावण्याची सवय लावा आणि आपल्या केसांची नैसर्गिक चमक टिकवा.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts