Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • वाल्मिक कराडला तुरूंगातच झाला मोठा संसर्ग; अचानक बिघडली प्रकृती, नेमकं झालं तरी काय?
Top News

वाल्मिक कराडला तुरूंगातच झाला मोठा संसर्ग; अचानक बिघडली प्रकृती, नेमकं झालं तरी काय?

walmik karad 2

Walmik Karad | बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं अपहरण करत त्यांनी निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) तुरूंगात शिक्षा भोगत आहे. मागील काही महिन्यांपासून वाल्मिक कराड तुरूंगाची हवा खात आहे. अशातच आता वाल्मिक कराडची प्रकृती अचानक खालावली आहे. त्याला तुरूंगातच मोठा संसर्ग झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – दिल्ली हादरली! कॉलेज परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

वाल्मिक कराडची प्रकृती अचानक खालावली, नेमकं झालं काय?

मागील काही महिन्यांपासून वाल्मिक कराड हा बीड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याला तुरूंगातच सलाईन लावून त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडला मूत्राशयाचा संसर्ग झाला आहे. त्याला मूत्राशयाच्या जागी त्रास होत असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला ‘युरोसिसटायटीस’ आजार झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून वाल्मिक कराडला तुरूंगातच सलाईन लावण्यात आली असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

कराडला मूत्राशयाचा संसर्ग झाल्यामुळे त्याला त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी परळी येथील अंबाजोगाई रूग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही कराडची प्रकृती अचानक बिघडली होती ज्यामुळे त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts