Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • सूर्याचा आगडोंब! अमरावती, अकोला आणि वर्ध्यात रेड अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्र

सूर्याचा आगडोंब! अमरावती, अकोला आणि वर्ध्यात रेड अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Red alert Maharashtra: राज्यात उष्णतेची तीव्र लाट उसळली असून अमरावतीत तब्बल 46.8°C तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे प्रशासनाने अनेक भागांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिकांचे हाल होत आहेत. भारतीय हवामान विभागाने अमरावती, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अमरावतीत तापमानाचा उच्चांक

गेल्या 24 तासांत राज्यातील सर्वाधिक तापमान अमरावती येथे नोंदवले गेले. शहरात तब्बल 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

अमरावती, अकोला आणि वर्धा येथे रेड अलर्ट असताना नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये तापमान 45 अंशांच्या पुढे गेले असून उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

वर्ध्यात तापमानाने मोडले विक्रम

वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत आहे. सलग दोन दिवस 46.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवल्यानंतर पुन्हा उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे वर्धा हे देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरत आहे.

पाणीटंचाईचे संकट गंभीर

उष्णतेमुळे अनेक भागांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे संतप्त नागरिकांनी नगरपालिकेसमोर आंदोलन केले.

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

भंडारा, गोंदिया, वाशिम, जळगाव, परभणी आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना पुरेसे पाणी पिणे, थेट उन्हात जाणे टाळणे आणि हलका आहार घेण्याचा सल्ला दिला आहे

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts