Pulwama attack mastermind Hamza Burhan Killed | पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार अर्जमंद गुलजार उर्फ बुरहान हमजा (Burhan Hamza) ठार झाला आसल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) काही अज्ञात हल्लोखोरांनी गोळीबार करत बुरहान हमजाचा खात्मा केला आहे. अर्जमंद गुलजार हा पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. तर आता त्याच्या मृत्युमुळे दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा – सुवेंदू अधिकारी पीए हत्या प्रकरणी पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला केलेली अटक, CBIच्या हाती लागला खरा आरोपी
पाकिस्तानमध्ये दहशतवादी बुरहान हमजा ठार
पाकिस्तानमधील मुझफ्फराबादमध्ये काही अज्ञात हल्लोखोरांनी अर्जमंद गुलजारवर गोळ्या झाडत त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुझफ्फराबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सुरक्षा यंत्रणांच्या मते अर्जमंद गुलजार हा बऱ्याच काळापासून भारतविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. अर्जमंद गुलजार मूळचा जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा भागातील होता. तसेच त्याची दक्षिण काश्मीरमधील तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात प्रमुख भूमिका होती. मिळालेल्या माहितीनुसार, 7 वर्षांपूर्वी तो वैध कागदपत्रांचा वापर करून पाकिस्तानला गेला होता जिथे तो अल-बद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. नंतर तो संघटनेचा ऑपरेशनल कमांडर बनला आणि पाकिस्तानमधून त्याने काश्मीरमध्ये दहशतवादी भरती, निधीपुरवठा आणि शस्त्रपुरवठ्याचे जाळे चालवायला सुरुवात केली होती.
अर्जमंद गुलजारला भारतीय सुरक्षा यंत्रणांन बऱ्याच काळापासून त्यांच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत ठेवले होते. तर 2022 मध्ये भारतीय गृह मंत्रालयाने त्याला अधिकृतपणे दहशतवादी म्हणून घोषित केले होते. मंत्रालयाच्या मते, पुलवामा आणि दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यात, तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्यात आणि दहशतवादासाठी निधी उभारण्यात तो सक्रियपणे सहभागी होता.












