PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (PM Narendra Modi) एआयचा (AI) वापर करून त्यांचे व्हिडीओ तयार करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी व्हिडीओ बनवणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपी नफिज आलम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – सुवेंदू अधिकारी पीए हत्या प्रकरणी पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला केलेली अटक, CBIच्या हाती लागला खरा आरोपी
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील आरोपी नफिज आलमने तयार केलेल्या एआय व्हिडीओमध्ये (AI Video) अपमानास्पद भाषा होती ज्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. नफीस आलमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एआय-निर्मित व्हिडिओ तयार करून पोस्ट करणं चांगलंच महागात पडलं आहे. मुंबईच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 मे रोजी ‘नफीस आलम’ नावाच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एआय-निर्मित व्हिडीओ तयार करून पोस्ट करण्यात आला होता. तर हा व्हिडीओ भाजपचे युवा मोर्चाचे नेते दीपक सिंह यांनी पाहिल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नफीस आलमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केवळ भाजप आणि पंतप्रधान मोदींविरोधात पोस्ट टाकल्या जात होत्या. या प्रोफाइलचे अंदाजे 9.5 हजार फॉलोअर्स असून नफीस आलम हा भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात सातत्याने खोट्या बातम्या आणि व्हिडीओ पोस्ट करत होता. आता या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून ते पुढील तपास करत आहेत.
मुंबई पोलिसांनी आता नफीस आलमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटसह अन्य एआय व्हिडीओ आणि त्याच्याशी संबंधित सोशल मीडिया खात्यांची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. कोणत्याही नेत्याची प्रतिमा मलीन करणे, दिशाभूल करणारी माहिती पसरवणे किंवा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे यांसारख्या एआय तंत्रज्ञानाच्या वापराच्या प्रकरणांना गांभीर्याने घेतले जात आहे.












