Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुणे दौरा; बारामती हॉस्टेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक
Pune

आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुणे दौरा; बारामती हॉस्टेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक

Deputy Chief Minister Sunetra Pawar Pune Visit: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक बारामती हॉस्टेल येथे पार पडत आहे.

या बैठकीत पुणे जिल्ह्यातील पक्ष संघटना, स्थानिक राजकीय परिस्थिती तसेच आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत सक्रियपणे सहभाग घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींविरोधात AI व्हिडीओ बनवणं पडलं महागात; पोलिसांनी केली कठोर कारवाई, नेमकं प्रकरण काय?

बैठकीदरम्यान जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित असून, आगामी राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

या वेळी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे देखील उपस्थित राहून चर्चेत सहभागी होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील संघटनात्मक बळकटीकरण आणि निवडणूक नियोजनावर विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

बारामती हॉस्टेलमध्ये होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts