Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • लोकसभेत राहुल गांधींच्या एका शब्दावरून खळबळ; ‘अंधभक्त’ उल्लेखावर सत्ताधाऱ्यांचा आक्षेप
Top News

लोकसभेत राहुल गांधींच्या एका शब्दावरून खळबळ; ‘अंधभक्त’ उल्लेखावर सत्ताधाऱ्यांचा आक्षेप

rahul gandhi

Rahul Gandhi Lok Sabha Speech: अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एक वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गोंधळ निर्माण झाला. भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी समाजातील तीन प्रकारच्या लोकांचा उल्लेख करत “विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त” असे शब्द वापरले. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला.

अँटी पेपर लीक विधेयकावर चर्चा करताना राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा संदर्भ देत आपले मत मांडले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा उल्लेख केला, त्यानंतर सभागृहात विरोधी प्रतिक्रिया उमटल्या.

राहुल गांधी यांनी आपले शब्द असंसदीय नसल्याचे सांगत भाषण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी त्यांच्या वक्तव्याला विरोध केला.

हेही वाचा: ‘आता शेवटचा लढा’; मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका विद्यार्थ्यासोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत सांगितले की, विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. विद्यार्थी नेहमी सत्याचा शोध घेतात आणि नवीन गोष्टी शिकण्यास तयार असतात, असे त्यांनी म्हटले.

त्यांनी सांगितले की, एका विद्यार्थिनीला “विद्यार्थी असणे म्हणजे काय?” असा प्रश्न विचारला असता तिने दिलेले उत्तर महत्त्वाचे होते. ज्याला आपण सर्व काही जाणतो असे वाटत नाही आणि ज्याचे मन नवीन विचारांसाठी खुले असते, तो खरा विद्यार्थी असतो, असे त्या विद्यार्थिनीने सांगितल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले.

‘अंधभक्त’ शब्दावरून वाद

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या भाषणात “अंधभक्त” या शब्दाचा वापर करताच सभागृहात गोंधळ झाला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या शब्दावर आक्षेप घेत तो असंसदीय असल्याचे म्हटले.

यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी संबंधित शब्द कामकाजाच्या नोंदीतून हटवण्याची मागणी केली.

त्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) पुन्हा बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी आपला मुद्दा मांडत भाषण पुढे सुरू ठेवले.

पंतप्रधानांच्या अनुपस्थितीवर राहुल गांधींची टीका

लोकसभेतील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री सभागृहात उपस्थित नसल्याचा मुद्दाही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

“चर्चा सुरू असताना पंतप्रधान सभागृहात का नाहीत?” असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारवर टीका करण्यात आले. तसेच सरकारने महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेत सहभागी व्हावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यांनंतर लोकसभेतील वातावरण काही काळ तापले आणि सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts