Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • संजय गायकवाडांना धमकी देणं पडलं महागात; न्यायालयानं दिला थेट दणका, नेमकं प्रकरण काय?
Top News

संजय गायकवाडांना धमकी देणं पडलं महागात; न्यायालयानं दिला थेट दणका, नेमकं प्रकरण काय?

Sanjay Gaikwad | शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे अडचणीत सापडले आहेत. त्यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या (Shivaji Kon Hota Book) शीर्षकावरून पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांना संजय गायकवाड यांनी संतप्त होत धमकी (Threat) दिली होती. तर आता संजय गायकवाड यांना धमकी देणं चांगलंच महागात पडलं आहे.

हेही वाचा – ठाकरेंना मिळाला मोठा धक्का; 250 कार्यकर्त्यांसह बडा नेता मुंबईकडे रवाना, भाजपमध्ये होणार सामील

संजय गायकवाड यांनी का दिलेली धमकी? नेमकं प्रकरण काय?

गेल्या काही दिवसांपूर्वी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून मोठा गदारोळ झाला होता. संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करत धमकी दिली होती. तसेच या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली आहे. यामध्ये महाराजांचा खोटा इतिहास लिहिला असून 300 ते 400 वेळा महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच या पुस्तकात औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी करण्यात आला आहे आणि महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे, असे आरोप संजय गायकवाड यांनी केले होते. याचे काही कथित ऑडिओ क्लिपही समोर आले होते.

संजय गायकवाड यांनी धमकी दिल्यानंतर प्रशांत आंबी यांनी त्यांच्याविरोधात कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तसेच संजय गायकवाडांची पोलीस चौकशी व्हावी यासाठी आंबी यांनी कोल्हापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तर आता या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी संजय गायकवाडांची चौकशी होणार असून त्यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, प्रशांत आंबी यांनी आणखी एक नवीन तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली आहे. संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून आजही धमक्या मिळत असल्याची माहिती आंबी यांनी पोलिसांना दिली आहे. त्यांना शंभरहून अधिक धमक्यांचे फोन आले असल्याची माहिती देत आंबी यांनी आणखी एक नवीन तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच तापलं असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts