Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ठाकरेंना मिळाला मोठा धक्का; 250 कार्यकर्त्यांसह बडा नेता मुंबईकडे रवाना, भाजपमध्ये होणार सामील
Top News

ठाकरेंना मिळाला मोठा धक्का; 250 कार्यकर्त्यांसह बडा नेता मुंबईकडे रवाना, भाजपमध्ये होणार सामील

Suresh Mapari | राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Group) मोठा धक्का मिळाला आहे. कारण विदर्भातील वाशिमचे (Washim) माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी (Suresh Mapari) यांनी भाजपमध्ये (BJP) सामील होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच सुरेश मापारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – व्हाइट हाऊसवर गोळीबार करणारा हल्लेखोर सापडला, नेमका का केला गोळीबार? चौकशीत मोठा खुलासा

सुरेश मापारी भाजपमध्ये प्रवेश करणार

सुरेश मापारी यांनी वाशिमच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी तातडीनं त्यांच्या समर्थकांसोबत एक बैठक घेतली होती. तर आता आता सुरेश मापारी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी ते काल रात्री 200 ते 250 प्रमुख पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते आणि सरपंचांसह तब्बल 29 वाहनांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

सुरेश मापारी हे आज भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुरेश मापारी यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तसेच राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाने सुरेश मापारी यांच्याकडून त्यांच्या जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे काढून घेतली होती. तर या पदाची जबाबदारी बालाजी वानखेडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ठाकरे गटाने घेतलेल्या या निर्णयामुळे आणि अंतर्गत राजकारणामुळे सुरेश मापारी हे नाराज होते. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मापारी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र या चर्चांदरम्यान अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts