Kapil Sharma | प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला (Comedian Kapil Sharma) मोठा धक्का बसला आहे. कपिल शर्माच्या घरावर गोळीबार (Firing) झाल्याची घटना घडली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी गाडीवरून येत कपिल शर्माच्या घरावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने कपिल शर्माला गंभीर इशारा देखील दिला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – मराठी बोलायला येतं का? आता परप्रांतीय रिक्षाचालकांची झोप उडणार, 15 ऑगस्टनंतर प्रशासन थेट अॅक्शन घेणार
कोणी केला कपिल शर्माच्या घरावर गोळीबार?
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर येथील हॉली सिटीमध्ये कपिल शर्माचा दोन मजली बंगला आहे. या बंगल्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गाडीवरून येत गोळीबार केला. दोन राऊंड गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. या घटनेमुळे कपिल शर्माच्या कुटुंबियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर कपिल शर्माच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकात तातडीनं तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान पोलिसांनी कपिल शर्माच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये त्यांना दोन व्यक्ती दिसत आढळून आले आहे. त्यामुळे आता हे दोन अज्ञात हल्लेखोर नेमके कोण आहेत? आणि त्यांनी कपिल शर्माच्या घरावर गोळीबार का केला? याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे घरावर गोळीबार करण्यापूर्वी कपिल शर्माच्या कॅनडातील सरे शहरातील ‘कॅप्स कॅफे’जवळही गोळीबार करण्यात आला होता. यादरम्यान कॅफेच्या शेजारील ‘चाय सुट्टा बार’ रेस्टॉरंटला टार्गेट करण्यात आले होते. या गोळीबारानंतर ‘टायसन बिश्नोई जोरा सिद्ध’ नावाच्या एका व्यक्तीने पोस्ट शेअर करत कपिल शर्माला गंभीर इशारा दिला होता. या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, हा फक्त एक संदेश आहे कपिल शर्माला वठणीवर आणण्यासाठी. सोबतच त्याने जर ऐकलं नाही तर पुढचं टार्गेट त्याचं कॅप्स कॅफे आणि मुंबईतील घर असू शकते, असा गंभीर इशारा कपिलला देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस सध्या तपास करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारावर हल्लोखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच या घटनेवर कपिल शर्माने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.






