TUKARM MUNDHE IAS : ना खाऊंगा ना खाणे दूंगा असा… असा दरारा अंगी बाळगणारे प्रशासकीय सेवेतील एक लोकप्रिय व वरिष्ठ अधिकारी म्हणजे वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) तुकाराम मुंढे आज अन्न आणि औषधी प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आपल्या धडाडी आणि कार्यकुशलतेमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. नुकतीच त्यांची झालेली अन्न आणि औषधी प्रशासनाचे आयुक्त म्हणून बदली हि त्यांच्या एकूण प्रशासकीय सेवेतील आत्तापर्यंतची पंचविसावी बदलीआहे.
आपल्या सततच्या बदलीमुळे तुकाराम मुंढे हे प्रशासकीय सेवेतील एक प्रसिद्ध व लोकप्रिय अधिकारी आहेत. दीडच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांची अन्न आणि औषध प्रशासन खात्यात आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणावर मोठी कारवाई
तुकाराम मुंढे यांनी पदभार दिव्यांग कल्याण विभागात पदभार सांभाळल्यानंतर विभागात मोठी “साफसफाई” मोहीम हाती घेतली होती. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेल्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र या कारवाईदरम्यानच त्यांची बदली करण्यात आली होती. 31 मार्च रोजी त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आणि दिव्यांग विभागातील ही तपास मोहीम थांबली होती. यानंतर त्यांची राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मदत कार्य विभागात बदली करण्यात आली. मात्र, दीड महिन्यांच्या आतच पुन्हा एकदा त्यांच्या बदलीचे आदेश जारी झाल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अन्न आणि औषध प्रशासन विभाग लाचखोरी
दरम्यान, मागील काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन विभाग लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत राहिला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा प्रशासकीय निर्णय घेत तुकाराम मुंढे यांची या विभागाच्या आयुक्तपदी बदली केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला असून, त्यानुसार आज ते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
त्यामुळे आता तुकाराम मुंढे यांच्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभाग प्रगती करते का आपल्याला परत एकदा तुकासरं मुंढे यहांची २६वि बदली पाहायला मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुकाराम मुंढे यांची आतापर्यंत कोणत्या ठिकाणी बदली झाली?
- ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
- सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
- जानेवारी 2008 – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
- मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग
- जुलै 2009 – सीईओ, वाशिम
- जून 2010 – सीईओ, कल्याण
- जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना
- सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई
- नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी
- मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका
- मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
- फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका
- नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन
- डिसेंबर 2018 -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
- जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका
- ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
- जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
- सप्टेंबर – 2022 – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
- 2022 – मराठी भाषा विभाग
- जुलै 2022 – पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
- जून 2024 – विकास आयुक्त (असंघटित कामगार)
-
ऑगस्ट 2025: सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, मंत्रालय












